औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसोयगाव तालुका

सोयगाव:जिल्हा बँकेसाठी जरंडीला ठराव,महिला सदस्याला मान देण्याचा संचालकांचा निर्णय

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवारी मतदानाच्या हक्क बाबत सेवा संस्थेच्या बैठकीत शैलाबाई राजहंस यांचा नऊ विरुद्ध चार असा ठराव संमत करण्यात आला त्यामुळे जरंडीला जिल्हा बँकेत मतदान चा प्रतिनिधी म्हणून महिलेला बहुमाना मिळाला आहे.सोयगाव तालुक्यात महिलेला बहुमान देण्याचा जरंडी सेवासंस्थेचा उपक्रमाची तालुकाभर चर्चा होत आहे.
जरंडी सेवासंस्थेची अध्यक्ष राजेंद्र रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गटसचिव दिलीप रावणे यांनी विशेष बैठक घेतली या बैठकीत इतर विषयांसह जीलः बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठविण्यासाठीचा विषय मांडण्यात आला यावेळी शैलाबाई राजहंस यांच्या नावाला श्रीराम पाटील त्यांनी सूचक म्हणून काम केल्यावर माधव नामदेव पाटील यांनी अनुमोदन दिले यावेळी सभागृहात राजेंद्र पाटील,शिवाजी किसान पाटील,श्रीराम पाटील,माधव पाटील,शंकर हुडेकर,उस्मान सांडू,हाजी राठोड,ज्ञानेश्वर मोरे,कौसल्याबाई पाटील या संचालकांची उपस्थिती होती तर चार संचालक गैरहजर राहिले होते.
शैलाबाई राजहंस यांच्या नावाचा ठराव संमत होताच दिलीप पाटील,मधुकर पाटील,अमृत राठोड,एकनाथ चौधरी,शेख पाशु,भिवा चव्हाण आदींनी जल्लोष केला.