अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

ञ्यंबक आसरडोहकर पञकारीता पुरस्काराचे अंबाजोगाईत वितरण

पञकारीतेची वाटचाल अधोगतीकडे―राही भिडे

ञ्यंबक आसरडोहकर हे प्रामाणिक पञकार व कल्पक लेखक होते―अनंतराव काळे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कै.ञ्यंबक आसरडोहकर पञकारीता पुरस्काराचे रविवारी अंबाजोगाईत वितरण करण्यात आले.यावेळी बोलताना जेष्ठ संपादिका राही भिडे म्हणाल्या की,पञकारिता क्षेत्रात जास्तीत -जास्त महिला आल्या पाहीजेत.
जागतिकीकरणाच्या कचाट्यात आजची प्रसारमाध्यमे सापडली आहेत.स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारी तेजस्वी पञकारीता मागे पडली असून आजच्या पञकारीतेची वाटचाल अधोगतीकडे होत असल्याचे सडेतोड विचार जेष्ठ संपादिका राही भिडे यांनी मांडले.तर ञ्यंबक आसरडोहकर हे प्रामाणिक पञकार व कल्पक लेखक होते.त्यांच्या कथांवर चिञपट होवू शकतो.पैशाच्या मागे न लागता आसरडोहकर यांनी आपल्या साप्ताहिकातून परखड मते मांडली.असे सांगून आज माणसा-माणसांत संवाद होत नाही.तो झाला पाहिजे.लोक मुक्तपणे व्यक्त होत नाहीत अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अनंतराव काळे यांनी बोलून दाखवली.

अंबाजोगाई येथील आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने पञकारीता क्षेञात उल्लेखनिय कार्य करणार्‍या मान्यवर पञकार व पञकारीता क्षेञातील युवा प्रतिभांना सन- 2010 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.कै.ञ्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठाणच्या वतीने या वर्षीचा नववा पुरस्कार वितरण सोहळा रविवार,दि.2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता विलासराव देशमुख सभागृह,नगरपरिषद, अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अमर हबीब,प्रमुख अतिथी राही भिडे (जेष्ठ संपादिका,दै.पुण्यनगरी, मुंबई.),प्रमुख अतिथी म्हणून अनंतराव काळे (जेष्ठ पत्रकार, आकाशवाणी केंद्र,औरंगाबाद), ञ्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचे सचिव चंद्रशेखर देशमुख या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते पत्रकार विद्या गावंडे यांना सन-2019 सालचा कै.ञ्यंबक आसरडोहकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह,फेटा,शाल, श्रीफळ,रोख रक्कम व पुष्पहार असे आहे.सत्काराला उत्तर देताना पञकार विद्या गावंडे म्हणाल्या की,माध्यम क्षेत्रात आजही महिला पञकारांना पुरूष पञकारांच्या बरोबरीचे स्थान,मान,वेतन नाही.अशाही काळात महिला पञकार आपले कर्तृत्व सिध्द करीत आहेत.मला मिळालेल्या आजच्या पुरस्काराने पञकारीता क्षेत्रात संघर्ष करणा-या सर्व महीला पञकारांचा गौरव झाला असल्याचे गावंडे म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोप करताना मुक्त पञकार अमर हबीब म्हणाले की.मातीचा गंध असलेल्या तरूण पञकारांना
ञ्यंबक आसरडोहकर पुरस्कार दिला जातो.महिला पञकार या कर्तृत्ववान असतात.स्ञियांकडे विपुल शब्द सामर्थ्य असते.एक पञकार म्हणून राही भिडे यांचे कार्य महिला पञकारांसाठी प्रेरणादायी आहे.काळ कालही असाच होता.कदाचित उद्या ही असाच राहील.तेव्हा आपल्याला मिळालेल्या संधीचे यशात रूपांतर करा,चांगले काम करा असा मौलिक संदेश अमर हबीब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी देशमुख यांनी केले.पाहुण्यांचा परिचय मुजीब काझी यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार ञ्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पञकार किरण आसरडोहकर यांनी मानले.या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार प्रा.नानासाहेब गाठाळ, डॉ.श्रीहरी नागरगोजे,डॉ. सिध्देश्वर बिराजदार,दगडू लोमटे,संभाजीराव लांडे,एस.बी. सय्यद,माणिकराव बावणे, रोहिणी पाठक,प्रा.अजय पाठक,प्रा.आर.ए.चौधरी धर्मापुरीकर,आशाताई वाघमारे, संतोष मोहिते,पञकार रामदास साबळे(केज),गोरख शेंद्रे,आनंद टाकळकर,राजेश लोखंडे, अॅड.निकाळजे यांचेसह शहरातील पञकार,वकील, साहित्यिक,डॉक्टर,महिला,युवक व अंबाजोगाई शहर आणि परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी कै.ञ्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठाणच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.