कार्यक्रममहाराष्ट्र राज्यसामाजिक

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उद्या मंगळवारी बचतगट चळवळीविषयी दूरदर्शनवर मुलाखत

आकाशवाणीवरुनही होणार बुधवार आणि गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

आठवडा विशेष|प्रतिनिधी

मुंबई, दि.२८ - ग्रामविकास तसेच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन : बचतगटांचे आर्थिक सक्षमीकरण’ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमामध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दि.२९ जानेवारी २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारीत होणार आहे. तसेच राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. ३० आणि गुरूवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत या मुलाखतीचे प्रसाणत होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबईत दरवर्षी भरणारे महालक्ष्मी सरस हे बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, या प्रदर्शनाचे वेगळेपण, या प्रदर्शनातील खाद्यसंस्कृती, विभागस्तरावर सुरू करण्यात आलेले महिला बचतगट सरस प्रदर्शन, देशातील पहिली अस्मिता योजना, बचतगटांना शुन्य टक्के व्याज दराने कर्ज देणारी योजना, बचतगटांची ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली उत्पादने, कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना दिलेला संदेश आदी विषयांची सविस्तर माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी 'जय महाराष्ट्र' व 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.