कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा म्हणून आसिफ सौदागर यांनी स्वखर्चातून प्रभागात केली जंतुनाशक फवारणी

पाटोदा:गणेश शेवाळे― आष्टी पाटोदा शिरून नगरपंचायत पैकी सर्वात आधी कोणी जंतुनाशक फवारणी केली तर पाटोदा नगरपंचायतचे प्रभाग आठचे कर्तव्यदक्ष नगरसेवक आसिफशेठ सौदागर यांनी केली असून त्यांनी दाखवून दिले आहे जिथे विषय गंभीर तिथे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी आसिफ सौदागर खंबीर असून प्रभाग आठ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून आपल्या प्रभागात जंतुनाशक फवारणी करून आपल्या वार्डातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण जागृत आहे हे दाखवून दिले असून नगरसेवक आसिफ सौदागर यांचा आदर्श बाकीच्यानीही घेऊन आपआपल्या वॉर्डात जंतुनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिक करत आहे तर आसिफ सौदागर यांनी प्रभाग आठमध्ये घरोघरी जाऊन कोरोना विषय जनजागृती करून हा आजार किती भयंकर आहे याची माहिती सांगून कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारा पासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे व काय करुनय याची घरोघरी जाऊन माहिती सांगितली खोकला,ताप, श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घ्या कोरोना पासून सावधान राहण्यासाठी साबण व पाणी वापरुन हात स्वच्छ धुवा,शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा,सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा,मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा रोजची वापराची कपडे गरम पाण्याने धुवावे,अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे नसता घरात बसून रहावे स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा ताप,खोखला श्वासोच्छवासात अडथळा लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा घरोघरी जाऊन मोफत मास्क वाटप करून दोन दिवसांच्या आत प्रभाग आठ मधील घराघरात सॅनिटायझरचे वाटप करणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात बसून राहाणे यामुळे अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा नसता आपआपल्या घरामध्येच थांबावे आशे आव्हान प्रभाग आठचे कर्तव्यदक्ष नगरसेवक आसिफ शेठ सौदागर यांनी केले आहे.


Previous post नगरसेवक संदीप जाधव यांचा अभिनव उपक्रम घरोघरी जाऊन कोरोना विषय जनजागृती करून मोफत मास्कची केली वाटप
Next post पुणे-मुंबईहून आलेल्यांना तपासणी करूनच गावात प्रवेश द्या– किशोर घुगे