औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसोयगाव तालुका

सोयगाव: कोरोना संसर्गाच्या दहशतीने शेतावर गेली बालके अखेर पाण्यात बुडाली ; मोलखेडा-नांदातांडा-देव्हारी दोन्ही गावांवर शोककळा

सोयगाव:मोलखेडा पाझर तलावात बुडून तिघांचा मृत्यू

सोयगाव,दि,२७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या दहशतीच्या सुट्या घालविण्यासाठी जवळच असलेल्या मामाच्या गावी गेलेल्यांना दोन भाचे आणि मामला शेतावर बैलांना पाझर तलावात पाणी पाजतांना बैलगाडी पाण्यात पलटी होवून बुडाल्याने जलसमाधी मिळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी मोलखेडा ता.सोयगाव पाझर तलावावर घडली.या घटनेमुळे सावळदबारा परिसरातील १२ खेडे हळहळले होते.या प्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने तातडीने आपत्ती निवारण घटनेचा पंचनामा केला असून फर्दापूर पोलिसात आकस्मिक मृतूची नोंद करण्यात आली आहे.
नांदा तांडा येथील मृतांचा मामा असलेला शेतकरी शामराव बच्चू राठोड यांच्या घरी शाळेला सुट्ट्या असल्याने देव्हारी येथील पल्लवी प्रकाश चव्हाण वय १२ व ओम प्रकाश चव्हाण(वय१०)हे दोघं नांदा तांडा येथे मामाच्या घरी गेले असता शुक्रवारी सकाळी शेतात बैलगाडी घेऊन मामा शामराव राठोड यांच्या सोबत वल्लभी चव्हाण व भाऊ ओम चव्हाण शेतात बैलगाडीवर गेले होते.शेताजवळील मोलखेडा शिवारातील पाझर तलावात बैलांना पाणी पाजण्यात गेले असता बैलगाडी न सोडता त्यांनी तसेच बैलगाडी पाझर तलावात नेले असता बैलांनी आत मध्ये ओढले व खड्ड्यात बैल गाडी पलटी झाली या घटनेत मामासह दोन्ही भाच्याचा व एक बैल मृत्यू झाला,दुसरा बैल गाडी बैलाची शिरवळ तोडून बाहेर निघाल्याने वाचला आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धरणातून मृत पावलेल्या शामराव राठोड(मामा वय १९ रा.मोलखेडा)पल्लवी प्रकाश चव्हाण(रा.नांदा तांडा भाची वय १२)आणि ओम प्रकाश चव्हाण(वय १० भाचा)आणि एक बैलाचा मृतदेह बाहेर काढला.या घटनेमुळे १२ खेड्यांना हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घातानेस्थाली फर्दापूर पोलिसांनी तातडीने धाव घेवून मृतांना बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय राजपूत यांनी शवविच्छेदन केले.मृत बैलावर पशुवैद्यकीय विभागाच्या पथकांनी शवविच्छेदन केले.फर्दापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.या प्रकरणी सुनील भिवसने,जमादार शेषराव मोरे,करताडे,गृग्रक्षक दलाचे जवान योगेश बोखारे आदि पुढील तपास करत आहे.