औरंगाबाद जिल्हापाचोरा तालुकाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुकाहेल्थ

कोरोना वायरस पार्श्वभूमीवर विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा यांच्याकडुन सर्व प्रकाराची ओपीडी मोफत

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पाचोरा-भडगाव व सोयगाव तालुक्यासह परीसरातील सर्व नागरीकांना कोरोना वायरस पार्श्वभूमी जनसेवेसाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा यांच्याकडुन सर्व प्रकाराची ओपीडी ( बाह्यरूग्ण तपासणी ) केली मोफत.
जळगाव जिल्ह्यातील एकमेव रूग्णालय ते जनतेच्या खरोखर सेवेसाठी विघ्नहर्ता परीवार आले पुढे.
आज दिनांक २७ मार्च ते १५ एप्रिल - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत - मोफत ओपीडी ( बाह्यरूग्ण तपासणीला ) झाली सुरुवात
आरोग्य क्रांतीचे प्रणेते डाॅ.भुषणदादा मगर यांचा फार मोठा जन-निर्णय
जास्तीतजास्त रूग्णांनी ओपीडी तपासणी चा लाभ घेण्याचे नम्र आवाहन .....
( पाचोरा प्रतिनिधी ) : पाचोरा-भडगाव तालुक्यासह परीसरातील सर्व नागरीकांना कळवण्यात येते कि,
कोरोना वायरस च्या पाश्र्वभुमीवरती आज शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२० ते १५ एप्रिल २०२० पर्यंत सर्व प्रकारांच्या आजारांची ओपीडी ( बाह्य रूग्ण तपासणी फी) मोफत करण्याचा फार मोठा जन-निर्णय विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा चे संचालक आरोग्य क्रांतीचे प्रणेते डाॅ.भुषणदादा मगर व डाॅ.सागरदादा गरूड यांनी केला आहे....
विशेष म्हणजे - जगामध्ये कोरोना वायरस धुमाकुळ घातला असुन काही दिवसांपुर्वी भारतामध्ये कोरोना हा दाखल झाला आहे आणि विशेष म्हणजे आपल्या *महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कोरोनाने धडक दिली आहे.
सुदैवाने जिल्ह्यात अजुनही कोणताही रूग्ण कोरोना संबंधित आढळलेला नसल्याने चिंतेची बाब नाही पण काळजी म्हणुन अजुनही जनतेत कोरोना वायरस च्या भीतीचे वातावरण आहे.
आपल्या भागातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये - विघ्नहर्ता परीवार पाचोरा आपल्यासोबत आहे. - राज्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणुन कलम १४४ आणि संचारबंदी कायदा शासनाने लागु केला आहे व २१ एप्रिल पर्यंत देश लाॅकडाऊन करण्यात आले आहे.

कोरोनाचे जरी कोरडा खोकला , सर्दी , ताप हे लक्षण असले तरी जनतेत संभ्रम पसरू नये व तसेच आपल्या भागात दुष्काळजन्य परीस्थिती असल्याने पुन्हा ओला दुष्काळ उद्भवल्याने शेतात आलेला माल पुन्हा परतीच्या पाऊसाने नुकसानीत आल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.किरकोळ आजार झाले असता नागरीक हे ओपीडी खर्चाच्या भीतीने घरी बसुन राहतात व योग्य उपचार योग्य वेळेत होत नसल्याने त्याचे रूपांतर मोठ्या आजारात होऊन भविष्यात मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास डाॅ.भुषणदादा मगर यांचे आले असल्याने त्यांनी योग्य उपचार योग्य वेळेत होऊन रूग्ण कसा ठणठणीत होऊन आपले सुंदर निर्भीड भयमुक्त आरोग्यमय आयुष्य जगेल यासाठी धाडसी निर्णय घेऊन पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनकल्याणासाठी ओपीडी ( बाह्य रूग्ण तपासणी मोफत ) करण्याचा फार मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अशा कठीण प्रसंगात काही वैद्यकीय क्षेत्र, राजकीय मंडळी व कार्यकर्ते व व्यावसायिक श्रीमंत उद्योजक मंडळी जनतेसोबत उभे राहत नसल्याने व साथ देत नसल्याने दुसरीकडे मात्र खंबीरपणे जनतेसोबत उभे राहण्याचा डाॅ.भुषणदादा मगर यांनी संकल्प केला आहे.
तरी पाचोरा-भडगाव तालुक्यासह परीसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने निर्भीडपणे भयभीत न होता सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा येथे येऊन ओपीडी ( बाह्य रुग्ण तपासणी ) करावी व योग्य वेळेत योग्य उपचार आपल्या आजारांवर करून आपले आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लाभ घ्यावा हि नम्र विनंती आरोग्य क्रांतीचे प्रणेते डाॅ.भुषणदादा मगर व डाॅ.सागरदादा गरूड आणि विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल परीवार पाचोरा यांनी केले आहे.