कार्यक्रमलातूर जिल्हासामाजिकहेल्थ

लातूर जिल्ह्यातील उजेड येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

आठवडा विशेष|प्रतिनिधी

शिरुर अनंतपाळ (लातूर) दि.२८: तालुक्यातील उजेड येथे सह्याद्री सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल लातुर,माऊली हाॅस्पीटल अॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर लातुर,अनंतपाळ व्हीजन सेंटर शिरुर अनंतपाळ व उदयगीरी नेत्रालय उदगीर,धनासुरे हाॅस्पीटल उजेड,जनता विकास मंच शिरुर अनंतपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील प्रसिद्ध अशा गांधीबाबा यात्रेनिमीत्त दि.२७ जानेवारी रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.
माऊली हाॅस्पीटलचे संचालक डाॅ.अरविंद भातांब्रे यांनी आयोजीत केलेल्या या शिबीराचे उद्घाटन सरपंच हामीद पटेल यांनी केले,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ तथा उजेड नगरीचे भुमीपुत्र डाॅ.संतोष बिरादार हे होते,प्रमुख पाहुणे म्हणुन माजी जि.प.सदस्य ऋषीकेश बद्दे,आयोजक डाॅ.अरविंद भातांब्रे,डाॅ.मल्लीकार्जुन धनासुरे,कन्या शाळेचे मुख्याध्यापक डिगोळे सर,उजेडचे तंटामुक्ती अध्यक्ष संजय बिरादार,र्‍हदयरोगतज्ञ सदानंद कांबळे,दंतरोगतज्ञ डाॅ.प्रदीप कुलकर्णी,डाॅ.सुदर्शन गुंठे,स्रीरोग तज्ञ डाॅ.अण्णासाहेब बिरादार,बालरोगतज्ञ डाॅ.रवीकिरण भातांब्रे,डाॅ.पद्मसिंह बिरादार,डाॅ.सुचीता शेळके हे होते.
या शिबीरामध्ये ६१६ रुग्णांची मोफत सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली.या शिबीरामध्ये येणार्‍या प्रत्येक गरजुची र्‍हदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मोतीबिंदु, दंतरोग चिकीत्सा अशा विविध तपासण्या मोफत करुन तज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्यांची मोफत योग्य ते औषधोपचार या शिबीरामध्ये करण्यात आले व गंभीर आजार असणार्‍या रुग्णांवर विविध योजनांच्या माध्यमातुन लातुर येथुल माऊली हाॅस्पीटल व सह्याद्री हाॅस्पीटल येथे योग्य ते उपचार केले जाणार असल्याची माहिती आयोजक डाॅ.अरविंद भातांब्रे यांनी यावेळी सांगीतली.
हे शिबीर यशस्वी करण्याकरीता श्रीराम गुराळे,नवाज चौधरी,अमजद पठाण,विठ्ठल गुळवे,राम शेळके, मोहिनी मोरे,प्रकाश पवार, बालाजी चाटे, लक्ष्मण माने आदींनी परीश्रम घेतले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.