अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर दंडात कपात ; अंबाजोगाई नगरपरिषदेचा निर्णय

लॉकडाऊन नंतर मिटींगमध्ये घेणार ठराव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाई मधील कर थकबाकीदारांच्या मालमत्ता कर दंडात कपात करण्याचा निर्णय अंबाजोगाई नगरपरिषदेने घेतला असून लॉकडाऊन नंतर मिटींग मध्ये याबाबतचा ठराव घेणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी, भाजपाच्या गटनेत्या सौ.संगीता दिलीपराव काळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सौ.राजश्री अशोक मोदी,मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय हा मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देणारा असून मालमत्ता कर थकबाकीदारांवर केली जाणारी शास्ती (दंड) यात नगरपरिषदेने कपात केली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भांव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या अंमलबजावणीस १३ मार्च पासून सुरुवात करण्यात आली आहे.त्यामुळे राज्या प्रमाणेच अंबाजोगाई शहरातील जनजीवन हे पुर्णत: विस्कळीत झाले आहे.याचा सर्वात मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.या साथ आजाराने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अंबाजोगाईतील व्यावसायिक आणि हातावर पोट करणार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कर थकबाकीदारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत नगरपरिषदेने त्यांना लागू केलेली शास्ती (दंड) यात कपात केली आहे. अशी माहिती नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी,भाजपाच्या गटनेत्या सौ.संगीता दिलीपराव काळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सौ.राजश्री अशोक मोदी,मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार

दरवर्षी 31मार्चला करदाते हे त्यांचे कडील करांचा भरणा नियमीतपणे करतात.यावर्षी माञ कोरोना विषाणु साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर
असलेले लॉक डाऊन, संचारबंदी तसेच स्वतःचे उद्योग आणि व्यवसाय बंद असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प आहेत.त्यामुळे सर्वसामान्य करदाते, अंबाजोगाईकर यांना 31 मार्च पर्यंत कर भरणा करता आलेला नाही.तसेच अंबाजोगाई नगरपरिषदेचे संपुर्ण प्रशासन हे कोरोना साथ रोगाच्या प्रतिबंधासाठी नियमीत स्वच्छता व औषध फवारणी आदी विविध उपाययोजना राबविण्यात व्यस्त आहे.या सद्य परिस्थितीची जाणीव नगरपरिषद प्रशासनास आहे.त्यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेने मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा दिला असून मालमत्ता कर थकबाकीदारांवर केली जाणारी शास्ती (दंड) यात नगरपरिषदेने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
―सौ.रचना सुरेश मोदी (नगराध्यक्षा,न.प., अंबाजोगाई.)

कर थकबाकीदारांना दिलासा देणारा निर्णय

संपूर्ण जगात करोना विषाणूमुळे उदभवलेली परिस्थिती अत्यंत भयानक आहे.तसेच राज्यात संचारबंदी लागु असल्याने, अनेक नागरिकांचे रोजगाराचे साधन बंद झाले आहे.अशा परिस्थितीत कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेने दंडात कपात
करण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊन नंतर मिटींग मध्ये याबाबतचा ठराव घेणार आहोत.
–डॉ.सुधाकर जगताप (मुख्याधिकारी,न.प.,अंबाजोगाई.)