पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू झालेला आहे.हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी,पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन पुणे , बीड ,रायगड, सोलापूर , सातारा ,उस्मानाबाद ,औरंगाबाद ,नांदेड ,नागपूर सह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विध्यार्थी फिलिपीन्स मधील दवाओ शहरात एमडी (भारतीय पध्दतीनुसार एमबीबीएस) चे शिक्षण घेत आहेत.त्यासर्वाना भारतात आणण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
फिलिपीन्स देशाचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो धुतर्ते यांनी कोविड 19 लॉकडाऊनचे नियम जो मोडेल त्यांना शूट ऍट साइट चे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत. दवावो शहरात 4 एप्रिल पासून एनहॅन्सड कम्युनिटी क्वारांटाईन लावले आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना जेवणासह इतर प्रॉब्लेम येणार आहे.त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारत सरकारने तात्काळ निर्णय घेऊन भावी डॉक्टर विध्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे.