#CoronaVirus संकट काळात पोलिसांवर केलेला भ्याड हल्ला दुर्दैवी- ऋषिकेश विघ्ने 

पाटोदा:आठवडा विशेष टीम― आज जगभरात कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या घरात लेकर,बाळ, कुटूंबासोबत बसलेला आहे. आपण स्वतः आपली मुलं, बाळ, कुटूंबाला कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेतात परंतु माझं राज्य माझा देश सुरक्षित राहावा म्हणून मुलं बाळाच्या व स्वतः च्या सुरक्षिततेचा धोका पत्करून रात्र-दिवस झटणारया पोलिसांवर संकट काळात हल्ला होतोय हे देशाचे दुर्दैव आहे. आज पर्यंत लाखो रुपये ज्याच्यावर उडवतो असे नट-नाट्य घरात दार लावून बसले आहेत.आज खरे हिरो हे कोरोनाच्या विरोधात लढणारे पोलीस, डॉक्टर, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, हे आहेत.आज पोलीसावर हल्ला झाला उद्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, विधुत कर्मचारी यांच्यावर होईल.पोलिसांवर भ्याड हल्ला करणाऱ्या नाराधानांवर कठोर शासन करा. कायदा काही कोणच्या बापाचा नाही कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीत काम करताना कायदा हातात घेऊन कोणी प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची कसलीही गय न करता फोडून काढावे.भविष्यात काम करतांना असे प्रकार होणार नाहीत असे आव्हान ऋषिकेश विघ्ने केले आहे.