#CoronaVirus बीड: कामात निष्काळजीपणा दाखविल्यामुळे नागपिंप्रीचे तलाठी जिलेवाड निलंबित

परळी:आठवडा विशेष टीम― राज्यात सध्या कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी २३ मार्च रोजी सर्व तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत मुख्यालयी राहण्याचे आदेश काढलेले आहेतमात्र परळी तालुक्यातील नागपिंप्रीचे तलाठी यांनी कामात निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित केले आहे. राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहेत्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि.२४ मार्च पासून नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू केला आहेसदर मनाई आदेशाचे उल्लंघन होऊ नये या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यातीलसर्व मंडळ अधिकारीतलाठी व ग्रामसेवक यांना त्यांच्या मुख्यालयी राहण्यासाठी व आदेशाचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमुद केले आहे. मात्र नागपिंप्री सज्जाचे तलाठी मोतीराम गुंडेवार जिलेवाड हे दि.२८ मार्च रोजी तहसील कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत जाणिवपूर्वक गैरहजर राहिले. त्याचबरोबर ते मुख्यालयी देखील हजर राहत नसल्याचे वारंवारं आढळून आलेजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे ते कोणत्याही प्रकारे पालन करीत नाहीत.तसेच नागरीकांना स्वस्त धान्य वाटपा संदर्भात संदेश देऊन सुध्दा दुर्लक्ष केले. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ चे नियम ४ च्या तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी गणेश महाडीक यांनी मोतीराम गुंडेराव जिलेवाडी तलाठी सज्जा नागपिंप्री ता.परळी यांनी राष्ट्रीय आपत्ती सारख्या परिस्थितीमध्ये जमावबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी तसेच साथरोग अधिनियम कोरोना विषाणु संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अंमलबजावणीबाबत कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्यामुळे तसेच सदर कामी हलगर्जीपणावरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना कर्तव्यात कसूर व निष्काळीजपणा केल्यानेशासन सेवेतून निलंबित करत असल्याचे महाडीक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. त्यानुसार मोतीराम जिलेवाड यांचे निलंबन काळात मुख्यालयतहसील कार्यालय परळी हेराहील असाही आदेश देण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत तलाठी जिलेवाड यांच्या दप्तराचा पंचनामा करून तलाठी सज्जा नागपिंप्रीचा अतिरिक्त पदभार शेख सलिम अहेमद यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत जिलेवाड हे मुख्यालयी हजर होत नाहीत तोपर्यंत त्यांचे कोणत्याही प्रकारचे वेतन, भत्ते अदा न करण्याचेही आदेशात म्हटले आहे.