कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदी पात्रता सोडा―श्रीराम मुंडे,राजाभाऊ फड

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील साठवण तलावातील पाणी कन्हेरवाडी नदी पात्रता सोडवावे अशी मागणी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीराम मुंडेव सरपंच राजाभाऊ फड यांनी परळी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशासह संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह आटोक्याचे प्रयत्न करीत आहेत. सध्या लाॕकडाऊन ही पुकारले आहे. परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी ग्रामस्थांना पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. सर्वत्र पाण्याचे टंचाई जाणवत आहे. त्यामुळे काही दिवसांनी माणसाना व मुक्या जनावरांना पाणी मिळणे अवघड जाणार आहे त्या करीता पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुर्व योजना म्हणून गाव शेजारी नदीपात्रात साठवण तलावातील पाणी सोडले तर गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटले तरी संबधीत विभागाने तात्काळ पाणी सोडून पाण्याची अडचण दूर करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीराम मुंडे व सरपंच राजाभाऊ फड यांनी केली आहे. कन्हेरवाडी ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ फड यांनी ही गावातील लोकसंख्या मोठ्या संख्येने असल्यामुळे शेतकरी, दुग्ध व्यवसाय धारक आहेत. जनावरांना पिण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे सर्व स्त्रोत बंद पडले आहेत. तलावातील पाणी जर नदीपात्रात पाणी सोडले तर पाणी प्रश्न मिटू शकतो अशी मागणी ग्रामपंचायत कडे मुंडे यांनी केली होती. या मागणीची सर्वानुमते ठराव मंजूर करून तो पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले आहे.
कन्हेरवाडी गावातील नागरिकांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा त्रास दूर करण्यासाठी तलावातील पाणी नदीपात्रात तातडीने सोडवे अशी मागणी मुंडे,फड यांनी केली आहे.