गावात नाकाबंदी का केली म्हणून दोघांवर सामूहिक हल्ला

केज:आठवडा विशेष टीम― तुम्ही गावकऱ्यांनी आम्हा परजिल्ह्यातील लोकांना रस्त्यात लाकडे आडवी टाकून गावबंदी का केली ? असे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ लोकांनी जिल्हा बंदीचा आदेश धुडकावून बीड जिल्हा हद्दीत येऊन केज तालुक्यातील लाखा या गावात येऊन फिर्यादी व साक्षिदार यांना लाकडी दांड्याने मारहाण करन एकाचे डोके फोडले या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील लाखा येथे दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील युसूफ महेबूब शेख, ताहेर युसूफ शेख, शाहेद युसुफ शेख, जुबेर रौफ शेख व इतर अनोळखी चारजण यांनी जिल्हा बंदीचा व कोव्हिड-१९ साथरोग प्रतिबंधक कायदा आदेश डावलून दोन चारचाकी वाहने व नोटारसायकल वस्न बीड जिल्हा हद्दीत प्रवेश केला. बीड जिल्हा हद्दीतील लाखा येथील गावकऱ्यांनी चेक पोस्ट तयार करून तुम्ही बाहेर जिल्ह्यातील लोकांना का प्रवेश नाकारला ? असे म्हणून ताहेर शाकेर पठाण वय २३ वर्षे यास लाखा शिवारात परसुराम रावसाहेब घाडगे यांचे शेताजवळ रस्त्यावर गावकऱ्यांनी ठिकाणी यातील आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना कुरापत काढ्न शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी चापटाने मारहाण केली. तसेच लाकडी दांड्यानी फिर्यादीच्या डोक्यात मारुन डोके फोड्न दुखापत केली. त्याच्या सोबतचे साक्षीदार यांना पण मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी फिर्यादी ताहेर शाकेर पठाण यांच्या फिर्यादी वख्न गु. र. नं. १३८/ २०२० भा. दं. वि. ३२३,३२३,५०४, ५०६, १४७, १४८, १५१ नुसार युसुफ महेबुब शेख, ताहेर युसुफ शेख, शाहेद यूसुफ शेख, जुबेर रौफ शेख व इतर अनोळखी चारजण हे सर्व रा शिराढोण ता. कळंब जि उस्मानाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.