अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

लोमटे (नवाब) परिवाराची सामाजिक बांधिलकी ; 800 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप , राज्य सरकारला 11 हजार रूपयांचा धनादेश

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.आण्णासाहेब काशिनाथराव लोमटे व
लोमटे (नवाब) परीवाराच्या वतीने रविवार,दिनांक 12 एप्रिल रोजी 800 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.

येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.आण्णासाहेब काशिनाथराव लोमटे व लोमटे (नवाब) परीवाराच्या वतीने खडकपुरा येथे अंबाजोगाईचे तहसिलदार संतोष रूईकर,ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.आण्णासाहेब लोमटे, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दाजिसाहेब लोमटे,बीड जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष सुनीलकाका लोमटे, प्रतिभाताई देशमुख,अॅड. संतोष पवार,शरद लोमटे, रवि देशमुख,अॅड.अजीत लोमटे,भीमसेन लोमटे, मनोज कदम,पञकार अविनाश मुडेगावकर,प्रशांत बर्दापूरकर,नागेश औताडे,रणजित डांगे,श्रीकांत कदम यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत रविवार पेठ,परळीवेस,समतानगर,साठे नगर,खडकपुरा आणि कोठार मोहल्ला येथील 800 गरजू कुटुंबांना पुढील 15 दिवस पुरेल एवढे गहू,ज्वारी,तांदूळ आणि दाळ हे जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवून प्रातिनिधिक स्वरूपात 10 जणांना वाटप करण्यात आले.उर्वरित सर्व गरजूंना त्यांचे घरी जीवनावश्यक साहित्य घरपोहोच करण्यात येणार आहे.लोमटे नवाब परिवार हा सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेऊन विविध सामाजिक उपक्रमात कायमच सहभागी होतो.कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून दाजिसाहेब लोमटे व लोमटे नवाब कुटुंबियांनी अंबाजोगाई शहरवासियांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या 'लॉकडाऊन' मुळे हातावर पोट असलेल्या मजूर,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कुटुंबांना लोमटे नवाब यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच यावेळी लोमटे नवाब यांच्या हिरो मोटर्स,न्यु भागिरथी मेडीकल,नाथ इलेक्ट्रिकल्स,भागिरथी मेडीकल आणि अमृतेश्वर अर्बन मल्टीनिधी या फर्मच्या माध्यमातून राज्य सरकारला 11 हजार रूपये मदतीचा धनादेश अॅड.आण्णासाहेब लोमटे यांचे हस्ते तहसीलदार संतोष रूईकर यांना देण्यात आला.लोमटे नवाब परिवाराने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे.जीवनावश्यक साहित्य वाटपासाठी कृष्णा लोमटे,किशोर लोमटे,प्रतापराव लोमटे,ऋषिकेश लोमटे,धीरज लोमटे,संजय साळवे,उमेश जोगदंड,सिध्देश्वर स्वामी,भीमसेन (अप्पा) लोमटे मित्र परिवार आणि मनोज (भैय्या) कदम मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला.

दानशूर व्यक्तींनी गरजूंना मदत करावी

लोमटे नवाब कुटुंबियांनी
स्व.काशिनाथराव लोमटे, स्व.बालासाहेब लोमटे,स्व. नागोराव पापा लोमटे यांचा समाजसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे.हाच वारसा जोपासत शहरातील
हातावर पोट असणा-या, मोलमजुरी करणा-या ज्यात स्ञी-पुरूष सफाई कामगार, घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजू अशा 800 लोकांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप 'सोशल डिस्टन्सिंगचा' नियम पाळून करण्यात आले.तसेच जयभारती प्रतिष्ठानचा मोफत भोजन उपक्रम,आधार माणुसकीचा उपक्रम यांनाही मदत केली.लोमटे नवाब यांच्या विविध फर्मच्या माध्यमातून राज्य सरकारला 11 हजार रूपये मदतीचा धनादेश देण्यात आला.
-अॅड.आण्णासाहेब लोमटे (ज्येष्ठ विधिज्ञ, अंबाजोगाई.)

शासनाने दिलेल्या सूचनांचेे पालन करा

अंबाजोगाई शहरातील जनतेने शासनाने दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे.शहरामध्ये नवीन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी.अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच कुटुंबातील एकानेच दिलेल्या वेळेत बाहेर येऊन आपले काम झाले.की,लगेच घरी जावे. संचारबंदी असल्याने घराबाहेर पडू नका.मास्क वापरा,गर्दी टाळा,वारंवार हात धुवा.आपली व कुटुंबियांची काळजी घ्या.

-संतोष रूईकर (तहसीलदार,अंबाजोगाई.)