आठवडा विशेष|प्रतिनिधी
अंबाजोगाई: रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने दिनदर्शिका- 2019 चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी देवल कमिटीचे विश्वस्त कमलाकर चौसाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू मोरे (अध्यक्ष, राजश्री शाहू पतसंस्था, अंबाजोगाई) हे होते.ना नफा ना तोटा या तत्वावर रोटरीच्या वतीने सदर दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली.यासाठी येथील युवा उद्योजक अनंत पाखरे यांनी त्यांच्या श्री ऑफसेट मार्फत माफक दरांत उत्तम सेवा दिली अशी माहिती रोटरीचे सचिव सर्जेराव मोरे यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.गितांजली ठोंबरे यांनी केले.प्रारंभी स्वागतगीत सादर झाले
मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.उपस्थितांचे आभार ज्येष्ठ रोटरीयन अॅड.अनंतराव जगतकर यांनी मानले.यावेळी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे अध्यक्ष पांडुरंग पाखरे, सचिव सर्जेराव मोरे, रोटरीचे माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी,सदाशिव सोनवणे,राजेंद्र रापतवार,पुरूषोत्तम वाघ,अनंतराव चाटे, विठ्ठलराव कदम, वामनराव जोशी, विश्वनाथ गिरगिरवार, सौ.अहिल्याबाई मोरे, सौ.सुशिलाबाई चौधरी सौ.यमुनाबाई पाखरे आदींसहीत रोटरीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.