बीड,दि.१४:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व मनाई आदेश मधील सुचनांच्या आधिन राहुन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग,राज्य महामार्ग आणि रेल्वेच्या कामांना अटीसह सशर्त परवानगी दिल्याचे आदेश राहुल रेखावार, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, बीड यांनी दिले आहेत .
सदर कामांच्या ठिकाणी सद्यस्थितीत कार्यरत मजुरांचे कॅम्पमध्ये असलेल्या व्यक्तीच्या मार्फत कामे करण्यात यावीत. कॅम्पमध्ये बाहेरुन कोणीही नवीन मजुर आणण्यास तसेच कॅम्पवरील मजुरांना अथवा कुटूंबियांना कॅम्पसाईट सोडुन जाण्यास पुर्णत: प्रतिबंध करावा.
मजुरांना क्षेत्रिय बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कॅम्पमध्येच दैनंदिन जिवनावश्यक गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेली सामग्री उदा.अन्न धान्य, भाजीपाला, किराणा माल, व ईतर आवश्यक बाबी उपलब्ध करण्याची व्यवस्था कंत्राटदार यांनी करावी.
प्रत्येक ठिकाणी सामाजिक अंतर (social distancing) ठेऊन कामे होत असल्याचे खात्री कंत्राटदार व कंत्राटदाराचे पर्यवेक्षित अभियंतांनी करावी व त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती क्षेत्रिय ठिकाणी अवलंबविण्यात यावीत. तसेच 40 पेक्षा जास्त कामगार असणार नाहीत याची दक्षता
घ्यावी.
कार्यक्षेत्रावरील कॅम्प मधील मजुर व त्यांचे कुटूंबिय, पर्यवेक्षिय कर्मचारी, अभियंते यांचेपैकी कोणालाही सदृश्य लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल,आरोग्य विभागास कळविणे व रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील.
कोरोना विषाणने संसर्गाबाबत सर्व मजुरांना व साईटवरील कर्मचारी यांना आरोग्य विषयक महत्वाचे मार्गदर्शक सूचना त्यांच्या मातृभाषेत स्पष्टपणे अवगत करण्यात यावीत. तसेच सुचनांचे पालन, अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री संबंधित यंत्रणेने करावी. जिल्ह्यात दि.30 एप्रिल, 2020 चे मध्यरात्री १२ वा. पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश लागू केलेला आहे.
या आदेशाची अवाज्ञा करणारा कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसहिता 1860 (45) याच्या कलम १८८ नुसार असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
०००
#WarAgainstCoronaVirus
#StayHomeStay SafeSaveLives
#COVID19
#मीचमाझारक्षक
@CollectorBeed @MahaDGIPR