लॉकडाऊन शिथील होईपर्यंत स्वारातीचे रूग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन देणार―रामचंद्र झंवर,संजय गंभीरे यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई शहरात सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र झंवर,संजय गंभीरे आणि महामृत्युंजय मंदीर ट्रस्ट हे मागील 21 दिवसांपासून सामाजिक बांधिलकी मानून दररोज स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रूग्ण व त्यांचे नातेवाईक अशा 300 गरजू लोकांना मोफत भोजन देत आहेत.केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यामुळे आता लॉकडाऊन कालावधी शिथील होईपर्यंत स्वारातीचे रूग्ण व नातेवाईकांना मोफत भोजन देणार आहोत अशी माहिती रामचंद्र झंवर,संजय गंभीरे, महामृत्युंजय मंदीर व्यवस्थापक यांनी दिली आहे.संचारबंदीच्या काळात सर्व बाजारपेठ ठप्प असून हॉटेल बंद आहेत.अशा परिस्थितीत अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मदत व्हावी दिलासा मिळावा याच विधायक हेतूने येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र झंवर, महामृत्युंजय मंदिर आणि संजय गंभीरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मोफत भोजन उपक्रम सुरू केला. मागील 21 दिवसांपासून 300 गरजू लोकांसाठी अन्नछञ सुरू आहे.दवाखान्यात उपचारासाठी असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक,शिवाय रस्त्यावरचे गरजू,गोरगरीब तथा मनोरूग्ण अशांना पोळी-भाजी वाटप सुरू केले आहे.याबाबत अधिक माहिती देताना संजय गंभीरे यांनी सांगितले की, अंबाजोगाईतील भाजपाचे जेष्ठ नेते रामचंद्रकाका झंवर,महामृत्युंजय मंदिर यांच्या सहकार्याने हा उपक्रम चालू केल्यानंतर मित्र परिवार तथा अनेकांकडून सहकार्य मिळत आहे.आम्ही सुरू केलेल्या कार्याचं अनेकांनी स्वागत केले आहे.या संकटात अशा प्रकारे मानवी साखळी उभा करून मदत करण्याची गरज आहे.या संकटात जिल्हयात गोरगरीब व गरजूंना मदत करण्याच्या सुचना भाजपा नेत्या पंकजाताई व खा.डॉ. प्रितमताईंनी केल्यानंतर संपूर्ण जिल्हा भाजपात प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी,लोकप्रतिनिधी हे आपआपल्या पध्दतीने शक्य तिथे मदत करतांना दिसत आहेत.दरम्यान या पार्श्वभूमीवर खासदार कार्यकर्ता यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.कोणते पदाधिकारी कुठे काय ? करतात याची माहिती त्या स्वत: घेत आहेत.जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.एवढेच नाही तर अनेकांना फोन करून त्या स्वःता संपर्क साधत आहेत.
आपल्या उपक्रमाची दखल घेवून खासदारांनी स्वत: फोन करून कामगिरीचे कौतूक केले.एवढेच नाही तर समाजकार्य करतांना प्रत्येकांनी आपली व आपल्या कुटूंबियांची काळजी घ्यावी अशा सुचना पण,त्यांनी केल्या.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल मुंदडा,राजेश भिसे, विश्वदीप पवार,महेश पवार, राहूल काचरे,बालाजी शिंदे, राहुल कांबळे,धनंजय हावळे,आकाश भिसे,दत्ता पवार,बालाजी गोडसे,हर्षल लखेरा,विष्णू शर्मा,प्रविण भिसे,इब्राहिम पटेल,रवी काचरे,राहूल शेळके,विशाल भिसे,राजेश गुट्टे,मंगेश भिसे,ॠषिकेश शर्मा,रवी लाड यांचे सहकार्य लाभत आहे.मोफत भोजन उपक्रमास सहकार्य करणारांचे आभार..!मोफत भोजन वितरण उपक्रम मागील 21 दिवसांपासून अव्याहतपणे सुरू आहे.केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढवला असला तरी एकवीस दिवसांपूर्वी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलेले अन्नछत्र हे लॉकडाऊन कालावधी शिथील होईपर्यंत सुरूच ठेवणार आहोत.याकामी मित्र परिवार,सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभले त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे.त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो.
―रामचंद्र झंवर,संजय गंभीरे (सामाजिक कार्यकर्ते,अंबाजोगाई.)