कुंभारी जिल्हा परिषद शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र (काका) धुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र (काका) धुरगुडे यांनी फित कापून केले.

यावेळी महेंद्र काका धुरगुडे यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना संबोधित करताना म्हणाले की , शाळेच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर त्या मला कळवाव्यात , कोणत्या विद्यार्थ्यांचे परिस्थिती च्या कारणाने शिक्षण थांबत असेल तर त्यांना केव्हाही सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगून , सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेच्या वतीने श्री महेंद्र (काका) धुरगुडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. अस्मिताताई कांबळे , पंचायत समिती सदस्या सौ. सविता कलसुरे , सरपंच अमरेद्दीन पटेल , शालेय व्य.स.अध्यक्ष पंडित वडणे पाटील , उपाध्यक्ष सत्तार मुलानी , मा. शालेय व्य.स.अध्यक्ष साहेबराव तांबे , दत्ता तांबे , पोलीस पाटील विठठल वडणे , पिंटू कलसुरे , मुख्याध्यापक दुरुगकर सर , अजिंक्य सरडे , संतोष वडणे , महेश क्षिरसागर , यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *