अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―आपला जीव धोक्यात घालून कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अहोरात्र जनतेची काळजी घेणारे,अत्यावश्यक सेवा देणारे घटक यांच्या सेवेची जाणीव ठेवून कृतार्थ भावनेतून प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाकडून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर त्यांचा सेवासन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.
संचारबंदीच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अंबाजोगाई शहरात अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर्स,परिचारिका, रूग्णालयातील कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस,स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग,सफाई कामगार नगरपरिषद कर्मचारी,बँका,पतसंस्था,औषध विक्री दुकाने,रोटरी क्लब,स्वयंसेवी सेवाभावी संस्था आणि विज वितरण कंपनी या सर्वांनी संकटकाळी देवदूतासारखी अहोरात्र देश व लोकसेवा केली आहे.याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे.याच जाणिवेतून लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर त्यांचा सेवासन्मान करण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने पुढाकार घेण्यात येत आहे.
अंबानगरीचा नांवलौकीक वाढविणारे प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ
अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शीनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या माध्यमातून शहराच्या शैक्षणिक,क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्राच्या परंपरेत भर टाकणारे व शहराची उंची,नांवलौकिक आणि वैभव वाढविणारे कार्य करण्यात येते.मंडळ सातत्याने विविध उपक्रम राबविते.यात उल्लेखनीय म्हणजे “बालझुंबड” हे विद्यार्थ्यांसाठीचे सशक्त व्यासपीठ होय.हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी कसे व्यापक करता येईल व नविन कोणते उपक्रम राबविता येतील याविषयी प्रियदर्शनी क्रिडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळ सतत प्रयत्नशील असते. सांस्कृतिक,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत कार्य करण्याची आवड असणारे लोक या उपक्रमाशी निगडीत आहेत.मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारा “बालझुंबड” हा उपक्रम गेली 20 वर्षे यशस्विरित्या सुरू आहे.या उपक्रमाचे यश म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी विविध स्पर्धा यांचे सुरेख आयोजन करण्यात येते.प्रियदर्शनी मंडळाच्या वतीने गरजूंना मदत करणे,वृक्षारोपन, रक्तदान शिबीर,रूग्णांना फराळ वाटप,विद्यार्थी साहित्य संमेलन,बालझुंबड, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करून प्रसंगी उच्च शिक्षणासाठी पाठबळ देणे आदी ठळक उपक्रम राबविण्यात येतात.या सोबतच इतर ही विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते.हे व्यासपीठ अधिक व्यापक,प्रभावी व समाज उपयोगी होण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला पुरक असे उपक्रम राबविण्याकरिता मंडळाचे पदाधिकारी दक्ष असतात. काल सुसंगत बदल स्विकारून “बालझुंबड” हे व्यासपीठ अधिक व्यापक बनले आहे.सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत शहर व परिसरातील मान्यवर व्यक्ती
प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाशी जोडली गेली आहेत हे विशेष होय.
अत्यावश्यक सेवा देणा-यांचा सन्मान करणार
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.असे असतानाही अंबाजोगाई शहरात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी,पोलीस, सरकारी,नगरपरिषदेचे कर्मचारी व सफाई कामगार,विज वितरण कंपनी हे सर्वजण नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्याचे काम करीत आहेत.या सर्वांचा प्रत्येकांनी आदर व सन्मान केला पाहीजे असे आवाहन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे,महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. बाळासाहेबजी थोरात आदींनी वेळोवेळी केलेले आहे.याच पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणा-या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी प्रियदर्शनी क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरस विरूद्ध युद्ध लढणा-या सर्वांचे मी आभार मानतो.कारण, “संकटाच्या या काळात डॉक्टर्स,परिचारिका, रूग्णालयातील कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र व्यवस्थापन, महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेल्या विविध सेवांमध्ये व्यस्त असलेले, नगरपालिका व सर्व शासकीय कार्यालयाचे सर्व कर्मचारी बांधव यांच्या सेवाकार्याचे मी आभार मानतो व कौतुक करतो.”
-राजकिशोर मोदी,(अध्यक्ष,प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ.)