बीड दि.३०:आठवडा विशेष टीम― कोणत्याही बँक खात्यातील पैसे काढण्याची पूर्णपणे सुरक्षित व पेपरलेस सुविधा कोरोना विषाणू ( COVID – १९ ) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर , भारत सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी , ज्यांना सध्याच्या लॉक डाऊन च्या परिस्थितीत त्यांची उपजीविका भागविणे कठीण जातेय , त्यांना ” प्रधानमंत्री गरीब कल्याण
योजनेच्या माध्यमातून रु . १ लाख ७० हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला असून सदरील रक्कम जन – धन योजना , PM – किसान योजना , उज्ज्वला योजना इ . योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये टप्या – टण्याने जमा केली जात आहे .
यामध्ये प्रामुख्याने महिला जन धन खातेधारकांच्या खात्यावर रुपये ५०० / – प्रति महिना ( ३ महिन्यासाठी ) आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर रुपये २००० / – ( PM – किसान योजनेअंतर्गत पहिला हप्ता ) तात्काळ जमा केले जात आहेत अशा परिस्थितीत गावातील नागरिकांची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी आपल्या गावातील डाक कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या पोस्टमास्तर / पोस्टमन यांचे मार्फत नागरिक आपल्या राष्ट्रीयीकृत व खाजगी बँक खात्यांमधून ( महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्य . बँक वगळून ) लाभाची किंवा इतर कोणतीही रक्कम AEPS द्वारे आधार नंबर
आणि मोबाइल नंबर वापरून काढू शकतात.
जिल्ह्यात मागील १० दिवसात नागरिकांनी जवळपास ३० लाख रुपये पोस्ट
ऑफिस मधून AEPS द्वारे काढले आहेत . पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंकमार्फत देण्यात येणाऱ्या AEPS या सुविधेद्वारे हि सेवा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . तरी या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन डाक अधीक्षक, बीड विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेन्ट बैंकेचे शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.