वाघिरा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा येथिल मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये हौतात्म्य पत्करलेले स्वा.सै.लक्ष्मण मारोती परळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले हुतात्मा स्मारक ,ग्रामस्थांना प्रेरणादायी तर आहेच परंतु हे महीन्याच्या कडक उन्हाळ्यात, अभ्यासिका, विश्रांतीगृह म्हणून वापर होतोय.
रामराव बांगर ,ग्रामस्थ वाघिरा :
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावेळी पाटोदा तहसिलवर मोर्चा काढण्यात आला होता.तेव्हा रझाकारांची आणि मोर्चेकरांची झटापट झाली त्यात स्वा.सै. मारोती परळकर रझाकारांची गोळी लागुन शहीद झाले.
सूरेश बांगर ,ग्रामस्थ वाघिरा :
वाघिराकरांसाठी स्वातंत्र सैनिक मारोती परळकर यांचे हुतात्मा स्मारक गौरव आहे. ऊन्हाळ्यात ग्रामस्थ विश्रांतीसाठी तर मुलं अभ्यासासाठी दुपारी इथं येतात , ग्रामपंचायतने लक्ष द्यायला हवे, आसपासच्या जागेत शेणाच्या गौऱ्या थापलेल्या दिसून येतात, याठिकाणी सूंदर बगिचा करायला हवा.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश :
दोन वर्षांपूर्वी गुत्तेदाराने हुतात्मा स्मारकाचा १० लक्ष रुपये निधी काम न करताच उचलून घेतला होता याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिल्यानंतर याची चौकशी झाली आणि अखेर गुत्तेदाराला दुरुस्तीचे काम करावेच लागले आणि २५ जानेवारी २०१९ रोजी या दुरुस्ती कामाचे लोकार्पण करण्यात आले.