बीड:आठवडा विशेष टीम―सामाजिक न्याय मंत्री व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजयजी मुंडे साहेब हे ऊसतोड मजुरांना कधी न्याय तर विशेष सहाय्य मंत्री घोषणा केलेले मोफत किराणा किट कधी वाटणार तर पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब ऊसतोड मजुरांचे पालक होऊन कधी मुजोर तलाठी आणि ग्रामसेवकांना वठणीवर आणणार , सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सवाल केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते, सरपंच यांनी धान्य वाटप केले, मात्र तलाठी, ग्रामसेवक यांना महिन्याभरात भेटायला वेळ मिळालाच नाही, मोफत किराणा किटची प्रतिक्षा ऊसतोड मजुरांना असल्याचेही डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले आहे.
सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील मौजे बेलखंडी (पाटोदा) येथिल बेलखंडी या गावातील ऊसतोड मजुरांना सरपंच संदिपान बडगे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर सामाजिक कार्यकर्ते अनिल माने पाटील यांनी मदतीचा हात पुढे करत धान्य वाटप केले, परंतु शासकीय अधिकारी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी महिनाभरापासून या ऊसतोड मजुरांची भेटच घेतलीं नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मजुरांना आता पालकमंत्री मुंडे साहेबांनी घोषणा केलेल्या मोफत किराणा किट वाटपाची प्रतिक्षा लागली आहे.
बबिता मोरे ,ऊसतोड मजूर
महिनाभरात तलाठी, ग्रामसेवक एकदाही इकडं फिरकले नाहीत, कोणीही भेटायला आले नाहीत.मोफत किराणा किट वाटप अजुन झालेच नाही.
रावसाहेब लक्ष्मण मोरे ,ऊसतोड मजूर
ग्रामसेवक, तलाठी महिनाभरात आलेच नाहीत, सरपंच संदिपान बडगे यांनी वाढदिवसानिमित्त आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल माने पाटील यांनी मदतीचा हात पुढे करत धान्य वाटप केले परंतु मोफत किराणा किट वाटप अजुन काही मिळाले नाही.
सुनिता रामभाऊ माळी ,ऊसतोड मजूर
तलाठी, ग्रामसेवक कधीच आले नाहीत, मोफत किराणा किट वाटप करण्यात आले नाही. लवकर वाटप करायला पाहिजे.
आनंद साहेबराव तुपे , ऊसतोड मजूर –
सरपंच संदिपान बडगे आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल माने पाटील यांनी धान्य वाटप केले परंतु तलाठी, ग्रामसेवक भेटायला सुद्धा आले नाहीत, मोफत किराणा किट वाटप करण्यात आले नाही.सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला हवं,आम्ही गावाच्या बाहेर शेतात राहतोय, सुविधा मिळाव्यात.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश–
बेलखंडी गावामधिल ऊसतोड मजुरांची तलाठी व ग्रामसेवक यांनी महिनाभरापासून भेटच घेतलीं नाही, सरपंच संदिपान बडगे व सामाजिक कार्यकर्ते अनिल माने पाटील यांनी मदतीचा हात पुढे करत धान्य वाटप केले परंतु पालकमंत्री मुंडे साहेब यांनी घोषणा केलेले व अजित कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी आदेशानुसार मोफत किराणा किट वाटप करण्यासाठी ०५/०५/२०२० रोजी त्रिस्तरीय समिती नेमण्यात येऊन मोफत किराणा किट वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.परंतू महिनाभर भेट न घेणारे ग्रामसेवक व तलाठी यांच्या बद्दल ऊसतोड मजुरांनी तिव्र नापसंती व्यक्त करत जिल्हाधिकारी बीड यांना लेखी तक्रार करण्याचे ठरवले आहे.तलाठीव ग्रामसेवकाने पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत पुरवठा आदि.सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असताना महीनाभर ऊसतोड मजुरांची भेटच न घेणे हे जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधितांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, अन्न पुरवठा मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.