औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19सोयगाव तालुका

सोयगाव: कोविड-१९ चा ग्रामीण भागात प्रसार होवू नये यासाठी प्रशासन सज्ज ,उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील सोयगाव तालुक्यात ठाण मांडून

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
तालुक्यांच्या ग्रामीण भागात कोविड-१९ चा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन शुक्रवारपासून सज्ज झाले असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांनी सोयगाव तालुक्याच्या कोविड-१९चं उपाय योजनांची शुक्रवारी फेरतपासणी करून आढावा घेतला.यामध्ये सोयगाव तालुक्यात संक्रमण वाढण्याची चिन्हे दिसताच तालुका प्रशासनाची पूर्वतयारीनिशी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी सोयगावसाठी अजिंठा(ता.सिल्लोड)येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरमध्ये सोयगाव तालुक्यासाठी २५ बेड राखीव करण्यात आल्याची माहिती ब्रजेश पाटील यांनी दिली असून तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात २५ नवीन बेडचा पुरवठा करण्यात आला आहे.उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांनी शुक्रवारी फर्दापूर,सोयगाव,जरंडी आदी भागातील विलीगीकरण केंद्रांचं पूर्वतयारीची पाहणी करून या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहे.तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे आदींचे पथक मात्र शुक्रवारी तालुक्यात सतर्क झाले होते.

जरंडीच्या विलीगीकरण केंद्रात तातडीने मुलभूत सोयी पुरवा-

जरंडी ता.सोयगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीत विलीगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.परंतु संबंधित ठेकेदाराने इमारतीच्या कामाच्या पूर्वी आय ठिकाणी वीज पुरवठा जोडणी न केल्याने हे केंद्र अंधारातच असल्याने या ठिकाणी येत्या दोन दिवसात वीज पुरवठा जोडणी करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहे.


Back to top button