‘वाघांनो रडू नका’ पंकजाताई मुंडेंनी कार्यकर्त्यांना केलं भावनिक ट्वीट

मुंबई:वृत्तसंस्था― राज्यात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल (८ मे) भाजपने विधापरिषदेच्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. यात रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, विधानपरिषदेच्या यादीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये दुःख झाले. “वाघांनो असे रडताय काय मी आहे ना”, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत त्यांच्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे.
पंकजा मुंडेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असे रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!”

Previous post राज्याबाहेरील लोकांना आणण्यासाठी 'मराठवाडा रहिवाशी संघाचा' पाठपुरावा
Next post जनतेसाठी आईच्या निधनाचे डोंगरा एवढे मोठे दु:ख विसरून पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने पाटोदा तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी लागले कामाला