महाराष्ट्र राज्यराजकारण

मोदींना PUBG वाल्यांचे प्रश्न सोडवायला वेळ आहे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी मात्र संवेदनशीलता नाही- धनंजय मुंडे

प्रतिनिधी: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाच दिवस उलटले. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लोकांच्या मागण्यांसाठी आण्णा हजारेंनी मोदींना ३६ पत्रं लिहीले. मोंदीकडून फक्त 'धन्यवाद' असे उत्तर पाठवले गेले. यांना PUBG वाल्यांचे प्रश्न सोडवायला वेळ आहे, सामान्यांच्या प्रश्नांसाठी संवेदनशीलता नाही. समाजासाठी आपले जीवन वेचणाऱ्या अण्णांना हे सरकार झुलवत आहे. आण्णांची तब्येत जलदगतीने खालवतेय. सरकारने आण्णांनी केलेल्या लोकहिताच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. आण्ण़ांना काहीही झाल्यास सरकार जबाबदार राहील.असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आयोजित केलेली परिवर्तन यात्रा आज पुणे जिल्ह्यात पोहोचली. मंचर, तळेगाव येथे झालेल्या सभेस उपस्थितांनी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला.

मंचरमधील परिवर्तन यात्रेची सभा ही थोडी वेगळी भासली. इतर सभांप्रमाणे या सभेत स्थानिक प्रश्नांबाबतचे एकही निवेदन आलेले नाही. एक निवेदन आलं ते बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबतचं. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील साहेबांनी केलेल्या विकासाचा, त्यांच्या नेतृत्वाचा लोकांनी मनापासून स्वीकार केलाय हेच यातून दिसते.

"मोदींची वर्तणुक नव्या सुनेसारखी आहे, काम कमी गवगवा जास्त. सरकारकडे दुष्काळासाठी मागितले ८ हजार कोटी आणि दिले ४ हजार कोटी ही परिस्थिती आज आहे. जुमलेबाजी करणाऱ्या सरकारला धडा शिकवायलाच हवा. माझा शेतकरी पण हुशार झालाय आता. म्हणे, मोदींनी खात्यात १५ लाख जमा केलेत. तेच खर्च कसे करायचे असा प्रश्न पडला असताना पुन्हा सहा हजार दिले. मोदी किती करता शेतकऱ्यांसाठी, थकला असाल. तुम्ही घरीच बसून आराम करावा ही व्यवस्था या निवडणुकीत करू आम्ही." अशी मोदींना सूचक फेसबुक पोस्ट विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.