औरंगाबाद: पहुरी,ता.सोयगाव येथे मोफत धान्य वितरणाबाबत नागरिक संतप्त ,लाभार्थ्यांना वगळणी केल्याने संताप ,अखेरीस ग्रामास्थांचीच मध्यस्थी

सोयगाव,दि.१४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यातील पहुरी ता.सोयगाव गावांमध्ये तब्बल ५८ कुटुंबियांना मोफत धान्यापासून वंचित राहावे लागल्याने धान्य न मिळाल्याने पहुरी येथे गुरुवारी संतप्त ग्रामस्थांनी तातडीने धान्य वितरण बंद केल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली होती.महसूल विभागाने तातडीने पहुरी गावाला भेट देवून काही प्रतिष्ठीत ग्रामस्थांच्या मध्यास्थितून महसूल कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात धान्य वितरण मोहीम अखेरीस सुरु केली होती.
पहुरी ता.सोयगाव येथील ५८ कुटुंबियांना ऐन टाळेबंदच्या स्थितीत पात्र असूनही अचानक नावे गायब झाल्याने मोफत धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली होती अखेरीस तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दूरध्वनीवरून ग्रामस्थांशी संपर्क साधून आठवडाभरात तुम्हाला धान्य उपलब्ध करून देण्याच्या आश्वासानावरून पहुरीला धान्य वितरण करण्याची प्रक्रिया दुपारी नायब तहसीलदार मकसूद शेख,पुरवठा अधिकारी नाना मोरे,मंडळ अधिकारी मधुकर धोंडकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आली होती.

पहुरी ता.सोयगाव येथे संतप्त ग्रामस्थांनी आमची नावे कशी गायब झाली याबाबत धारेवर धरले होते त्यामुळे बुधवारी आलेल्या या पुरवठा अधिकाऱ्याला पळता भुई कमी झाली होती अखेरीस पुन्हा महसूल पथक पहुरी गावात धडकल्यावर मात्र प्रतिष्ठित ग्रामस्थ आनंदा पाटील,बापू निकम,राजू पाटील,बापू डवने,आदींनी मध्यस्थी करून ग्रामस्थांना शांत केल्यावर मात्र वितरण व्यवस्था पूर्ववत झाली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post औरंगाबाद: सोयगाव तालुका आज शंभर टक्के बंद , महसूल आणि पोलीस प्रशासनाचे आदेश
Next post आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत चना खरेदी जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रावर सुरु