औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―
महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दर वर्षी राज्यमध्ये पावसाळा पूर्वी शेळ्यामेंढया सह जनावराचे रोगप्रतिबंधक लसीकरण जिल्हा आणि तालुका पशु वैद्यकीय अधिकारी मार्फत केले जाते.
पण यावर्षी कॉरोना सारख्या संसर्गजन्य रोगामुळे जुन महिन्यापूर्वी दिल्या जाणाऱ्या लसीकरण न केल्या मुळे शेळ्या मेंढ्या मृत्यू होत आहे या मुळे मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाज वर आर्थिक अडचणी ला सामोरे जावे लागत आहे या कडे राज्य शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे यासाठी मुख्यमंत्री कार्यलय, पशुसंवर्धन विभाग यांना धनगर समाज क्रांती मोर्चे चे संस्थापक डॉ संदीप घुगरे यांच्या नेतृत्वाखाली युवा मेंढपाळ संघटक शिवाजी नेमाने यांनी ई-मेल मार्फत मेंढपाळ ची अडचण राज्य शासनाला सांगितली आहे.
दरवर्षी प्रमाणे मान्सूनपूर्व लसीकरणाची कोणतीही मोहीम पशुसंवर्धन च्या जिल्हा आणि तालुका अधिकारी मार्फत राबवली नाही मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेळ्या मेंढया वर लाळ्या रोग, खुरकत, घटसर्फ, फऱ्या, पी पी आर यासारख्या साथीच्या रोगांची लक्षणे दिसून येतात त्यामुळे या सारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मे आणि जून या काळावधीत वरील साथीच्या रोगांचे रोगप्रतिबंधक लसीकरण करतात पण यावर्षी केले नसल्याने मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेळया मेंढ्या वर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही,
आणि त्यातच राज्यात कॉरोना संसर्गजन्य रोगा मुळे महाराष्ट्र लॉग डाऊन असल्याने शेळ्या मेंढयाची विक्री पण बंद झाली आहे, शेळया मेंढ्याची विक्री होत नसल्यामुळे मेंढपाळ च्या वस्ती वर कोल्हे लांडग्या चे हल्ले पण वाढले आहे मेंढपाळ हा गावं वड्या वस्ती वर भटकंती करून शेळ्या मेंढ्यांची निगा राखत असतो पण सध्या लॉगडाऊन मुळे यांना गाव बंदी ला पण सामोरे जावे लागत असल्याने मेंढपालना किराणा समान, घरगूती साहित्य ,औषधी मिळत नाही,
या सर्व कारणांमुळे राज्यातील धनगर समाजाच्या मेंढपाळ करणाऱ्याचा विचार राज्य शासनाने लवकर करून राज्यतील शेळ्या मेंढ्याची रोगप्रतिबंधक लसीकरण करण्याचा आदेश पशुसंवर्धन विभागाला द्यावा.
तसेच पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आणि तालुका अधिकारी कडून मेंढपाळला योग्य ते सहकार्य करत नाही आणि वेळेवर लसीकरण करत नसल्यामुळे शेळया मेंढया मरण पावतात आणि त्याच अधिकारी वर्ग मरण पावलेल्या शेळ्या मेंढया चा पंचनामा करत नाही या कारणामुळे मेंढपाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते त्यामुळे अकार्यक्षम अधिकाऱ्या वर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कार्यवाही करावी
या सर्व परिस्थितीचा राज्य शासनाने तातडीने लक्ष्य देऊन तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती धनगर समाज क्रांती मोर्चा च्या पदाधिकारी प्रदेश संघटक शिवाजी नेमाने,जन क्रांती संघ चे युवा संघटक किरण लिंगायत ,जेष्ठ समाजसेवक रामनाथ मंडलिक,नारायण खोसे, भीमराव शेळके, दीपक महानवर, दादाराव नजन, गणेश तोतरे, कृष्णा तोतरे,किशोर घुगरे, या समाजबांधवांनी निवेदन वर स्वाक्षरी करून धनगर समाज क्रांती मोर्चा चे अध्यक्ष डॉ संदीप घुगरे यांच्या ई- मेल मार्फत राज्य शासनाला आपल्या परिस्थिती ची आठवण करून दिली.
0