बीड जिल्हा

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कुंबेफळ जिल्हा परिषद शाळेच्या गायत्री किर्दंत विद्यार्थीनीची स्पृःहनिय कामगिरी

“डोंबारी" बालनाटिकेत उत्कृष्ट अभिनय

अंबाजोगाई (प्रतिनिधी): तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ (केंद्र अंबासाखर कारखाना) येथील कु.गायत्री विश्वनाथ किर्दंत या विद्यार्थीनीने नुकत्याच संपन्न झालेल्या १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत औरंगाबाद विभागातून स्पृःहनिय कामगिरी केली.राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे आयोजित या स्पर्धेत कु.गायत्री किर्दंत हिने “डोंबारी" या बालनाट्याचे सादरीकरणात सहभाग घेतला होता.तिने उत्कृष्ठ अभिनय केला.यासाठी तिला पारितोषिक जाहिर झाले आहे. ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना गायत्रीने बालनाट्यामधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून अभिनयाचे पारितोषिक पटकाविल्याबद्दल तिचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

दि.१४ ते २९ जानेवारी २०१९ या कालावधीत १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा बीड,औरंगाबाद,नांदेड, लातूर या ठिकाणी घेण्यात आली.या स्पर्धेत एकुण ७१ नाटके सादर करण्यात आली. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून गोविंद गोडबोले, संजय पेंडसे,धीरज पलसे यांनी काम पाहिले.अभिनयासाठी गायत्री किर्दंत हिला अरूण सरवदे, शाळेतील सहशिक्षीका श्रीमती गुळभिले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.गायत्री किर्दंत हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी प्रणिता कापसे,केंद्रप्रमुख आर.डी.गिरी, कुंबेफळच्या सरपंच सौ.वृंदावणी वसंतराव भोसले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकर्ण इंगोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उषा रामधामी सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.