कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

पाटोदा: कोरोनावर मात करण्यासाठी तालुक्यातील प्रशासनाची पोलिस स्टेशन मध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न

बाहेर गावावरून लपवून येणाऱ्याची माहिती लपविणाऱ्यांवर होणार कारवाई– तहसिलदार रमेश मुंडलोड

पाटोदा तालुक्यात बाहेरुन आलेल्या व्यक्तीचीं माहिती लपवून ठेवू नयेे–पोलिस निरक्षक सिद्धार्थ माने


पाटोदा:गणेश शेवाळे― गेल्या दोन महिन्यापासून आपण कोरोना या विषाणू रोगाला दूर ठेवले असून,ह्या यशामध्ये नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे.परंतु सध्या शासनाच्या पारवानगीने लोकं आप-आपल्या गावात येत आहेत.तसेच काहि लोकं छुप्या मार्गाने सुध्दा येत आहेत.ज्या गावामध्ये बाहेरगावावरुन,परराज्यातून नागरिक आल्यास तात्काळ गावातील ग्रामपंचायतला किंवा आशा वर्कर यांना कळवावे जर कोणी आशा लोकांची माहिती लपवून ठेवली तर त्यांच्यावर कोठर कारवाई करण्याचा ईशारा पाटोदा तहसिलदार रमेश मुंडलोड व पोलिस निरक्षक सिद्धार्थ माने यांनी दिला आहे.

तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या तालुक्यात होऊनय म्हणून पाटोदा पोलिस स्टेशन मधील बैठकी मध्ये तहसिलदार मुंडलोड, पोलिस निरक्षक माने,सपोनी कोळेकर नगरपंचायतचे सिओ भोसले ,आरोग्य अधिकारी तांदळे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शेख इमरानभाई यांच्यामध्ये विविध विषयावर महत्त्व पुर्ण चर्चा झाली यानंतर पाटोदा शहरात पोलिस व सर्व विभागातील प्रमुख आधिकार्या बरोबर पोलिस बांधवाने शक्तिप्रदर्शन केले यावेळी कोरोना पासून तालुक्यातील नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून दिवस-रात्र लढणाऱ्या डॉक्टर पोलीस महसूल प्रशासनातील कोविंड योद्धावर पाटोदा शहरातील नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला यावेळी तहसिलदार यांनी बोलताना सांगितले की नागरिकांनी घाबरुन न जाता सुरक्षेतेची काळजी घेऊन सतर्क राहवे.यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून गावात बाहेरून आलेल्या नागिकांची माहिती प्रशासनाला कळवावी किंवा गावात ग्रामपंचायत,पोलिस पाटील, तलाठी, मंडळधिकारी, आशा वर्कर यांच्यापैकी कुणालाही कळवावी याउपरही जर संबंधित व्यक्तींची माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी दिला आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.