बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील मान्सुनपुर्व कामे महावितरणने तात्काळ करावीत
बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश गावांतर्गत विद्युत तारा लोंबकळत असुन अपघाताला निमंत्रण ठरत आहेत,तसेच मौजे बेलगांव येथिल महादेव शेळके यांच्या शेतातील मुख्य विद्युत वाहीनीचे सोमनाथवाडी ते बेलगांव ते लिंबागणेश विद्युत पोल वाकले असुन त्यांना शेती मशागत करण्यासाठी अडचण ठरत आहे.
महादेव शेळके , शेतकरी–
आमच्या शेतातुन मुख्य विद्युत वाहिनी जात असुन विद्युत पोल कलल्यामुळे शेतीची मशागत करण्यास अडचण येत आहे, ट्रक्टर अथवा बैलजोडीने शेतीची मशागत करताना विद्युत तारांना चिकटण्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महावितरणने तात्काळ पोल सरळ करावेत.
आण्णा शेळके ,ग्रां.पं.स.बेलगांव–
मी ग्रां.पं.स.असुन वारंवार महावितरणचे अधिकारी इंजिनिअर यांना फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन या वाकलेल्या पोल विषयी अडचणी सांगितल्या पण नुसतंच येतो असं म्हणतेत आणि येत नाहीत.काल येतो म्हणल्यानंतर गावातील १२-१५ जण आम्ही पोल सरळ करताना मदत करावी म्हणून दिवसभर रानातील कामधंदा सोडून बसुन राहीलो पण कुणीच आलं नाही.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश–
बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागातील महावितरणने पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीची कामे उदा. वाकलेले खांब सरळ करणे ,लोंबकळणा-या विद्युत तारा दुरूस्ती करणे कारण त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच उघड्यावरील रोहीत्र त्यांना झाकण बसवणे , खांब आणि तारांचे मजबुतीकरण, रोहित्रांची देखभाल व दुरुस्ती तसेच पावसाळ्यात वा-यावादळामुळे झाडांच्या फांद्यांचा विद्युत तारांशी संघर्ष होऊन विजपुरवठा खंडित होणे आदि. महावितरण संबंधित अडचणी पावसाळा तोंडावर असतानाच तात्काळ दुर करून दुरुस्ती करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार साहेब, कार्यकारी अभियंता बोबडे साहेब, उपमुख्य कार्यकारी अभियंता सानप साहेब,महावितरण बीड विभाग यांच्या मार्फत मुख्यमंत्री उदृधवजी ठाकरे साहेब, ऊर्जामंत्री नितिनजी राऊत साहेब, कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड मा.धनंजयजी मुंडे साहेब यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.