गोंदिया: अर्जुनी नगरीत कोरोना रोगाचा वाढता प्रभाव, नगरपंचायतने लावले आदेश

अर्जुनी मोर:बिंबिसार शहारे (जिल्हा प्रतिनिधी)― कोरोना रोगावर प्रतिबंध लावण्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारचे ऊपाय करीत आहे परंतु या रोगाचे तात्काळ परीनाम दिसुन येते नाही, व हा रोग संक्रमित होत जातो. त्यामुळे आपल्याला शासनाने दिलेल्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्जुनीत बरडटोली या ठिकाणी पाँझीटीव्ह रुग्न मिळाला त्यामुळे अर्जुनी /मोर क्षेत्रातील वैद्यकीय सेवा व दुग्ध डेअरी वगळता सर्व दुकाने अस्थापना दिनांक 26/05/2020 पासुन पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहतील. किराणा दुकान- सकाळी 9 ते दू 1 पर्यत आठवड्यातुन 3 दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी घरपोच सेवा देण्यात येईल. भाजीपाला – सकाळी 7 ते दु 1 पर्यंत सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सुरू राहतील. अर्जुनी नगरपंचायत ने अशा प्रकारचे आदेश नगर वासीयांना दिलेले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.