गोंदिया: भर दिवसा गोळीबार..पोलीस प्रशासन मात्र गाड झोपीत

गोंदिया:बिंबिसार शहारे जिल्हा प्रतिनिधी―गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या शास्त्रीवार्ड परिसरातील मंतर चौक परिसरात राहणार्या इसमावर गोळी व चाकूने वार घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.या गोळीबारात चक्रधर बोरकर हा व्यक्ती जखमी झाला आहे,त्याचावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परिसरातील चर्चेनुसार बोरकरवर आरोपींनी देशी कट्टा व चाकुने वार करुन जखमी करण्यात आले,ही घटना दुपारी 2.30 च्या सुमारासची असून बोरकर हा दुध डेयरीजवळ बसून होता.बोरकर ज्याठिकाणी बसला होता त्याठिकाणी पोचून एका व्यक्तीने देशीकट्याने फायर केला तर दुसरा आरोपीने येऊन चाकूने पायावर वार करीत जखमी केले.. विशेष म्हणजे करोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना तलावर घेऊन गोंधळ घालणे व गोळीबारसारख्या घटना हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे.घटनेची माहिती पसरताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी हलविले होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.