बीड, दि.२६:आठवडा विशेष टीम―जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेल्या गावांसह एकूण 85 गावांमध्ये व त्याच्या परिसरामध्ये घरोघर सर्वेक्षण करुन संशयित रुग्ण शोध, त्यांना संदर्भ सेवा व कोविड-19 बाबत प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे यामध्ये दि. २५ अखेर एकूण 17448 घरातील 92866 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने बीड जिल्ह्यात संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
आत्तापर्यंत 49 स्वॅब नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत तसेच आतापर्यंत जिल्ह्यातून
तपासलेले स्वॅब नमुने 901असून 830 नमूने
निगेटिव्ह आहेत. प्रलंबित अहवाल 30 तर इनकन्क्लुजिव अहवाल 22 आहेत. पॉझिटिव पैकी आतापर्यंत एक रुग्ण बरा होऊन घरी सोडण्यात आला असून एकाचा मुत्यु झालेला आहे. 49 थ्रोट स्वॅब नमुने पॉझिटिव्ह नमुने आले असल्याने संशयित रुग्ण शोध साठी कन्टेंनमेंट झोन मध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.
याचबरोबर परदेशातून आलेल्या एकूण व्यक्ती 124 असून त्यांपैकी होम क्वारंटाईन झालेल्या 6 व्यक्ती , होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या 118 व्यक्ती , इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन 12 व्यक्ती जिल्ह्यात आहेत. इतर जिल्ह्यातून आलेल्या आणि होम क्वारंटाईन केलेले व्यक्तींची संख्या 12 हजार 948 झाली आहे अशी माहिती दिली आहे.