औरंगाबाद: शासकीय कामांसाठी सोयगावला लगभग , नागरिकांची शासकीय कार्यालयांवर गर्दी

सोयगाव,दि.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोविड-१९ च्या तब्बल ६२ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांची अडकलेल्या शासकीय कामांचा निपटारा करण्यासाठी गुरुवारीपासून ग्रामीण भागातल नागरिकांचा तालुक्यावर ओढा वाढला आहे.परंतु शासकीय कार्यालयावरील नागरिकांची हि गर्दी मात्र प्रशासनाला चिंतेची बाब ठरली आहे.या गर्दीमुळे अधिकारी आणि खुद्द नागरिक यांच्यासाठी कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मार्च महिन्यापासून शेतकरी आणि नागरिकांची कामे खोळंबली आहे.जिल्हाधिकारी यांनी नुकतीच चौथ्या लॉकडाऊनमधून शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामासाठी शेती उपयुक्त कामांसाठी सूट दिली असून शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्येही वाढ केली आहे.परंतु शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी दिसताच नागरिकांनीही तालुक्यावर ओढ वाढविली असल्याने ६२ दिवसानंतर सोयगावला गुरुवारी शासकीय कार्यालयात शेताकात्यांची लगभग आढळून आली होती.परंतु वाढलेली नागरिकांची गर्दी आणि अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती कोरोना संसर्गाला धोक्याची ठरली आहे.यामध्ये सोशल डीस्टेन्स आणि तोंडाला मास्क नसण्याच्या चित्र आढळून आले आहे.

निवडक अधिकाऱ्यांनाच मास्क-

शासकीय कार्यालयात गुरुवारी निवडक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच तोंडाला मास्क आढळून आलेले होते,त्यातच ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या तोंडालाही मास्कचा अभाव आढळून आला होता.

सिल्लोड-औरंगाबादवरून आले होते अधिकारी व कर्मचारी-

सोयगावला शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी सिलोड आणि औरंगाबादवरून ये-जा करतात त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या शासकीय कार्यालयातील नागरिकांना या अधिकारी व कर्मचार्यांपासून कोरोना संसर्गाचा धोका आणि अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांपासून धोका अशी दुहेरी स्थिती सोयगावला उद्भवली आहे.

शासकीय कार्यालयात गुरुवारी मात्र कामांचा निपटारा करण्यासाठी मोठी लगभग आढळून आल्याने सलग ६२ दिवसांपासून ठप्प असलेल्या कामांचा निपटारा करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी विविध कार्यालयात असूरक्षितरित्या कामे हाताळत होते या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयात सॅनिटायझर आणि हॅडवाॅश उपलब्ध करण्यात आलेले नव्हते त्यामुळे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.