गोंदिया जिल्हा पोलीस द्वारे अतिदुर्गम नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील भागातील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

देवरी:राहुल उके―गोंदिया जिल्हयातील पोलीस ठाणे सालेकसा अंतर्गत येणारे ग्राम मुरकूडोह क्रमांक-1, मुरकूडोह क्रमांक-2, मुरकूडोह क्रमांक-3, दंडारी, टेकाटोला व दलदलकुही हा अतिनक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग आहे. या भागातील लोकांचा भात (धान) शेती हा मुख्य व पारंपारिक व्यवसाय आहे. येथील शेतकरी यांनी मोठया प्रमाणात धानाचे उत्पादन घेवून चांगली आर्थिक प्रगती करावी व शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे तसेच शासन व पोलीस प्रशासनाच्या प्रती विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून वरील गावातील एकुण 250 शेतक-यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे वतीने शेतीसाठी खरीप हंगामी पेरणीसाठी 1010 या वाणाचे बियाणे (प्रत्येकी 25कि.ग्रॅ.याप्रमाणे) आणि भेंडी, काकडी, वांगी, पालेभाज्या इ. विविध भाजीपाला वाणाचे बियाणे (प्रत्येकी 100 ग्रॅम व 50 ग्रॅम याप्रमाणे) श्री. मंगेश शिंदे (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे हस्ते आज दिनांक 27/05/2020 रोजी वितरित करण्यात आलेले आहे. तसेच सदर बियाणांची कशा प्रकारे पेरणी करावी व निगा राखावी याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

नक्षलवादयांच्या भूलथापांना बळी न पडता प्रशासनास मदत करावी. आपल्या मदतीशिवाय या भागाचा सर्वांगीण विकास करणे शक्य नाही. तरी, शासन व पोलीस प्रशासनास सर्वतोपरी मदत करून शासनाच्या मुख्य प्रवाहात येवून आपला व आपल्या भागाचा विकास करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री.जालींदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव, श्री.राजकुमार डुणगे, ठाणेदार, पो.स्टे.सालेकसा, श्री.प्रमोद बघेले, प्रभारी अधिकारी, नक्षल सेल, गोंदिया तसेच तालुका कृषी अधिकारी, सालेकसा हजर होते.

सदर बियाणे वितरण कार्यक्रम दरम्यान कोरोना विषाणुचे अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले तसेच Physical/Social Distancing, मास्क व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे तंतोतंत पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post औरंगाबाद: कोरोनामुक्त लोकचळवळीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा –जिल्हाधिकारी उदय चौधरी
Next post यवतमाळ: आणखी १० जणांचे कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह, संख्या २४ वर