औरंगाबाद- गुरुवारी ४५ जण पॉझिटिव्ह ,आतापर्यंत जिल्ह्यात १४०७ कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यात 901 कोरोनामुक्त, 438 रुग्णांवर उपचार सुरू

औंरगाबाद, दि.२८:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 901 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 438 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1407 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (2), बुडीलेन (1), समता नगर (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (3), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी (4), रेल्वे स्टेशन परिसर (2), सिटी चौक (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), साई नगर एन सहा (1), संभाजी कॉलनी, एन सहा (2), करीम कॉलनी रोशन गेट (1) अंगुरी बाग (1), तानाजी चौक, बालाजी नगर (1), एन अकरा हडको (1), जय भवानी नगर (2), एन-4 सिडको पुंडलिक नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), अन्य (1), शहा बाजार (1), राणा नगर (1), कांचनवाडी (1), उस्मानपुरा (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 20 महिला आणि 25 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 901 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) चार, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 11 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. तर मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 901 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीमध्ये आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत 58, खासगी रुग्णालयात नऊ, मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 68 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post गोंदिया: नवीन ६ कोरोना बाधित रुग्ण आढळले ,कोरोना बाधितांची संख्या पोहचली ५६ वर , ५३ क्रियाशील रुग्ण
Next post औरंगाबाद: कोरोनामुक्त लोकचळवळीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा –जिल्हाधिकारी उदय चौधरी