सोयगाव,दि.२:आठवडा विशेष टीम―
सोयगाव तालुक्यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी पहिली ते आठवी साठी १४०७९ पुस्तके उपलब्ध झालेली आहे.त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होणार आहे.परंतु अद्यापही शाळांचा मुहूर्त निघालेला नसल्याने पालकांची चिंता लागून आहे.
सोयगाव तालुक्यात ९३ प्राथमिक शाळांसाठी शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तके योजनेसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवी या वर्गांसाठी १४०७९ पुस्तके उपलब्ध करून दिली आहे.परंतु शैक्षणिक वर्ष सुरु होण्याची अद्यापही चिन्हे दिसत नसल्याने पुस्तक मिळण्याचा यंदाचा मुहूर्त मात्र निघालेला नाही.गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तके उपलब्ध करण्यात आली असून या सर्व पुस्तकांची आठही केंद्रात रवानगी करण्यात येईल यामध्ये शाळानिहाय पुस्तकांना शिक्षक आणि मुख्याध्यापक पहिल्याच दिवशी वितरण करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली असून मात्र शासन पातळीवर हा पहिला दिवस अद्यापही ठरलेला नाही.