कोरोना विषाणू - Covid 19गोंदिया जिल्हाब्रेकिंग न्युज

गोंदिया: नियमांची अमलबजावनी करणारे तिरोडा न.पा मुख्याधिकारी स्वतः नियम पाळतील का ?मुख्याधिकारी यांच्या मनमर्जी कारभाराविरुद्ध व्यापाऱ्यांनी धोपटले दण्ड

तिरोडा:बिंबिसार शहारे― तिरोडा शहर कोरोना बाधीत झाले होते. आता शहर कोरोना रुग्ण मुक्त झाले आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे कोविड-१९ मधील मार्गदर्शक तत्वानुसार जी.एम. तळपाडे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी तिरोडा तालुक्यातील स्थानिक तिरोडा तिलक वार्ड, नागठाणासमोरील परिसरातील तिवारी यांचे घर ते गुलाब पाणठेला, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनायल मार्ग, राजेश पोहा मिल जवळील रस्ता, राजीव गांधी आयटीआय जवळील शकुंतला भवन जवळील मार्ग कॅन्टेनमेंट झोन म्हणून घोषित केले होते.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  मुख्याधिकारी यांची उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाची केली पायमल्ली

  उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाला न जुमानता चक्क नगर पालिकेचे श्रेत्र बंद केल्याने येथील नागरिक, व्यापारी, चिल्लर विक्रेते यांना समाश्यांचा सामना करावा लागला.

  मुख्याधिकारी यांचे मनमर्जीचे कळस

  कंटेंन झोन वगळता व्यापारी प्रीतिष्ठान बंद करण्याचे आदेश नसतांनी तिरोडा शहर कोरोना मुक्त झाल्यावरही व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवले आहे.

  व्यापारी प्रतिष्ठानांनी पुकारले बंड

  तिरोडा शहर कोणामुक्त होताच व्यापा-यांनी १ जून पासून आपली दुकाने सुरू केली आहेत.

  नगर पालिका मुख्याधिकारी हे स्वतःच होम कोरोटाईन कोरोनटाईन झोन सदरात असल्याची माहिती पडले आहे.

  असे असून देखील आमदार विजयभाऊ राहँगडाले हे व भाजप शहर अध्यक्ष स्वानंद पारधी यांचे सोबत मुख्याधिकारी कंटेंटमेंट झोन ला भेट देण्यासाठी फिरतांना दिसत आहेत. नियमांची अंमलबजावनी करणारेच कायदा मोडीत आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाव जात,पात, पंथ,धर्म, पक्ष, विपक्ष, गरीब, श्रीमंत असा भेद पळत नाही. मग नगर पालिका मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यस्थेला तळा दिला असून त्यांचे वर एफआयआर का केली जाऊ नये ? या चर्चा शहरात रंगतांना दिसत आहे. कायदा कोणताही असो सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. निदान वरिष्ठ प्रशासने तरी तिरोडा नगर पालिका मुख्याधिकारी हे कोरोनेट आहेत किंवा नाही. याची माहिती जाहीर करण्याची मागणी तिरोडा शहर वासीयांनी केली.

  माजी आमदार यांनी मुख्याधिकारी सूचना आणि व्यापा-यांसाठी नुकसान भरपाईची मागणी

  माजी आमदार दिलीपभाऊ बन्सोड यांनी ७ दिवस दुकान बंद होणे हे नगरपालिकेचे पाप असून दुकानदारांना नगरपालिकेने आर्थिक मदत करण्याचं मागणी केली आहे.


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.