बीड जिल्हा

राजमुद्रा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतिने सुप्रसिद्ध व्याख्याते अमोल मिटकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन

व्याख्यानास शिवप्रेमीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- शिंदे, नाईकवाडे, कुल्थे

बीड दि.१० (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली राजमुद्रा सामाजिक संघटना यांच्या वतिने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव सोहळा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आप्पा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीच्या राजमुद्रा सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या पदाधिकाऱ्याने यावर्षी शिवजयंती निमित्त दि.१२ फेबुवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता आपल्या पाहाडी आवाजा मुळे अंखड महाराष्ट्रात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते म्हणून ओळख निर्माण करणारे सर्व शिवप्रेमीचे लाडके शिवश्री अमोल दादा मिटकरी यांचे पराक्रमा पलीकडील छञपती शिवराय ह्या विषयावर तुफान व्याख्यान होणार असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर तर प्रमुख उपस्थिती विजयसिंह पंडित,अँड शेख शफिक, रमेश पोकळे,दिलीप गोरे, अशोक हिंगे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत यामुळे पराक्रमा पलीकडील छञपती शिवराय या अमोल दादा मिटकरी यांच्या व्याख्यानातून शिवरायांच्या ऐतिहासिक कामगीरीचे दर्शन उपस्थितांना होणार असल्याने बीड जिल्ह्यातील शिवप्रेमीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजमुद्रा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेश शिंदे,उपाध्यक्ष योगेश नाईकवाडे,सचिव वैभव कुल्थे यांनी केले आहे


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.