परळी दि.६:आठवडा विशेष टीम―
परळी येथील जगतकर गल्लीतील एक महिला औरंगाबाद येथे आपल्या किडणीच्या आजाराचा उपचार घेण्यासाठी गेली असता तेथील घाटी रुग्णालयात पॉझिटिव्ह आढळुन आली होती.आरोग्य प्रशासनाने या महिलेच्या संपर्कात आलेल्या ३० व्यक्तींना पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतले असुन यातील ८ संशयीत व्यक्तींचा स्वॅब परळी उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले असुन पुढील रिपोर्टसाठी पाठवण्यात आले आहेत.उर्वरित २८ व्यक्तींना अंबाजोगाई येथील कोवीड-१९ केअर सेंन्टरला ठेवण्यात आले आहेत.उद्या या २८ व्यक्तींचे स्वॕब घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवले जातील.
दरम्यान परळी उपजिल्हा रुग्णालयातुन काल पाठवलेले ७ स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय परळी वै.
दि.६/६/२०२०
आज घेतलेले स्वॅब –८
काल पाठवलेले स्वॅब–७
निगेटिव्ह–७
पॉझिटिव्ह–००
प्रलंबित–००
आज पर्यत पाठवलेले एकुण स्वॅब ११८
निगेटिव्ह ….११५
पॉझिटिव्ह ….०२ (कोरोना मुक्त)
प्रलंबित …… ००