औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद जिल्ह्यात दि.१० बुधवारी कोरोनाचा कहर दिवसात १२५ पॉझिटिव्ह रुग्ण ,३ जणांचा मृत्यू

औरंगाबाद दि.१०:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 837 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 125 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2275 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. कैलास नगर (3), कटकट गेट (1), संसार नगर (1), बारी कॉलनी (2),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (1), औरंगपुरा (1),सिडको एन सात (2), अरिहंत नगर (1), न्याय नगर, गारखेडा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), गजानन नगर, गारखेडा (1), भानुदास नगर (1), गारखेडा परिसर (5), सारंग सोसायटी (2), सहयोग नगर (2),सिटी चौक (1), खोकडपुरा (1), फाहेत नगर, राहत कॉर्नर (3), हर्ष नगर (2), बाबर कॉलनी (1), टिळक नगर (2), शहा बाजार (1), पडेगाव (3), शिवाजी नगर (1), बेगमपुरा (2), बजाज नगर,सिडको (1), जुना बाजार (1), मुलमची बाजार,सिटी चौक (2), मयूर नगर, एन अकरा (3), एन आठ (2), आकाशवाणी परिसर (1), मसोबा नगर (1), एन अकरा (1), एन चार,सिडको (1), विशाल नगर (1), आदिनाथ नगर, गारखेडा (2), जाधववाडी (1), टी. व्ही. सेंटर (1), आरटीओ ऑफिस परिसर (1),चित्रेश्वर नगर (1), बीड बायपास (1), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (2), रोकडिया हनुमान परिसर (1), मस्के पेट्रोलपंपाजवळ (1), प्रताप नगर,सिडको (1), एन सहा, साई नगर,सिडको (1), बंजारा कॉलनी (1), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (1), ज्योती नगर, दर्गा रोड (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (2), सावरखेडा, ता. सोयगाव (2), कन्नड (1), सिता नगर, बजाज नगर (5), बजाज नगर परिसर (11), सिडको वाळूज महानगर एक (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गणेश नगर, पंढरपूर (2), रोशन गेट (1), गल्ली नं.2 पुंडलिक नगर (1) खोकडपुरा (1), जय हिंद नगर, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर एन 2, सिडको (1), सिल्क मिल कॉलनी (1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा परिसर (1) गल्ली नं.27, बायजीपुरा (1), भावसिंगपुरा (1) हर्सूल परिसर (1) अन्य (16) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 42 महिला आणि 83 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
*आतापर्यंत 1317 जण कोरोनामुक्त*
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1317कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    घाटीत चार, खासगीत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

    शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील 79 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 9 जून रोजी रात्री 10.20 वा., दिलरास बिस्मिल्लाह कॉलनीतील 55 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा दुपारी 1.55 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच आज सकाळी 10.45 वा. किल्लेअर्क येथील 79 वर्षीय महिला आणि बायजीपुरा, सेंट्रल नाका येथील 38 वर्षीय पुरुष रुग्णाचा दुपारी 2.30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला.
    तर एका खासगी रुग्णालयात टिळक नगरजवळील रवींद्र नगरातील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 92, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 28, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 121 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.