जळगाव जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी अॅड अभय (दादा) पाटील यांची निवड

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्रीमा..उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्रजी मिर्लेकर जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना पक्षाची बाजू मांडण्यासाठी, शिवसेना कार्य, ध्येय धोरण, तळागाळातील शिवसैनिक , जनते पर्यंत पोहचण्यासाठी, व संघटना मजबुतीकरणासाठी, पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड. अभय शरद पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच, पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या शिवसेना प्रवक्ते पदी रावसाहेब मनोहर पाटील निपाणे, रमेश बाफना कोल्हे, अरुण रुपचंद पाटील कुऱ्हाड, गणेश परदेशी भडगाव, ऍड.अभय शरद पाटील शिंदाड, गणेश भीमराव पाटील, पाचोरा आदी मान्यवरांचे पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, यांनी अभिनंदन केले. तसेच, सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.