सोयगाव,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात झालेल्या ढगफुटीच्या वादळी वाऱ्याच्या पावसात घोसला शेती शिवारात एका झाडावर कोसळलेल्या विजेचा कपाशी पिकांना फटका बसला असून कपाशी होरपळली आहे.
घोसला ता.सोयगाव शिवारातील शेतीच्या बांधावर असलेल्या झाडावर कोसळलेली वीज शेतात परावर्तीत होवून हंगामीपूर्व लागवड केलेल्या कपाशीच्या पिकांवर कोसळल्याने हंगामी पूर्व कपाशी पिके होरपळली आहे.घोसला शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवून दिला होता.या पावसासोबतच विजांचा मोठा कडकडात असल्याने एकनाथ बळीराम गव्हांडे यांच्या गट क्र-१३४ मधील शेताच्या बांधावर असलेल्या झाडावर कोसळलेली वीज शेतात परावर्तीत झाल्याने पिकांची राख झाली आहे.यामध्ये शेताकात्याचे मोठे नुकसान झाले