मुंबई दि.१३:आठवडा विशेष टीम― राज्यात आज १५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १ लाख ०४ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१६.३ टक्के ) आले आहेत. राज्यात ५ लाख ८३ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५८० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७९ हजार ७४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात ११३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ८७ (मुंबई ६९, ठाणे ३, नवी मुंबई ८, पनवेल ६, कल्याण-डोंबिवली १), पुणे- १९ (पुणे १०, सोलापूर ८, सातारा १), औरंगाबाद-३ (औरंगाबाद ३), लातूर -३ (लातूर २, नांदेड १), अकोला-१ (यवतमाळ १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७३ पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६५ रुग्ण आहेत तर ३८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या ११३ रुग्णांपैकी १० रुग्णांच्या इतर अतिजोखमीच्या आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १०३ रुग्णांपैकी ८३ जणांमध्ये ( ८०.६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३८३० झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ७३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २७ मे ते १० जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४० मृत्यूंपैकी मुंबई १९, नवी मुंबई -८, सोलापूर -४, ठाणे -३, पनवेल -३, कल्याण डोंबिवली – १, पुणे -१ आणि सातारा १ मृत्यू असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५६,८३१), बरे झालेले रुग्ण- (२५,९४७), मृत्यू- (२११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव रुग्ण- (२८,७६३)
ठाणे: बाधित रुग्ण- (१७,३०६), बरे झालेले रुग्ण- (६८१८), मृत्यू- (४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१०,०६२)
पालघर: बाधित रुग्ण- (२२१६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१४५४)
रायगड: बाधित रुग्ण- (१७८१), बरे झालेले रुग्ण- (११४८), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (५६७)
नाशिक: बाधित रुग्ण- (१८५२), बरे झालेले रुग्ण- (११७०), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५८०)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६०)
धुळे: बाधित रुग्ण- (३५३), बरे झालेले रुग्ण- (१९९), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१२७)
जळगाव: बाधित रुग्ण- (१६३३), बरे झालेले रुग्ण- (६५३), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८६०)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१४)
पुणे: बाधित रुग्ण- (११,७२२), बरे झालेले रुग्ण- (६५६७), मृत्यू- (४६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६८६)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१७३८), बरे झालेले रुग्ण- (६५४), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९५६)
सातारा: बाधित रुग्ण- (७३१), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२८४)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६९२), बरे झालेले रुग्ण- (५२१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६३)
सांगली: बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (११४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१००)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७४)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३९२), बरे झालेले रुग्ण- (२५६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२१)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२५६०), बरे झालेले रुग्ण- (१४००), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०३२)
जालना: बाधित रुग्ण- (२५८), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९६)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२३६), बरे झालेले रुग्ण- (१८४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५१)
परभणी: बाधित रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)
लातूर: बाधित रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३७)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०)
बीड: बाधित रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (२३)
नांदेड: बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७)
अकोला: बाधित रुग्ण- (९९०), बरे झालेले रुग्ण- (५०९), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (४४०)
अमरावती: बाधित रुग्ण- (३३५), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७१)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४१)
वाशिम: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३३)
नागपूर: बाधित रुग्ण- (९८२), बरे झालेले रुग्ण- (५३९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४३१)
वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६)
भंडारा: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (११)
गोंदिया: बाधित रुग्ण- (६९), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२०)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६०)
एकूण: बाधित रुग्ण-(१,०,४५६८), बरे झालेले रुग्ण- (४९,३४६), मृत्यू- (३८३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव रुग्ण-(५१,३७९)
(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४७ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)