यवतमाळ दि.१३:आठवडा विशेष टीम― नेर येथील 83 वर्षीय व्यक्तिचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. सदर व्यक्तिला सारीचे लक्षणे असल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. मात्र आज (दि. 13) सकाळी 10.30 वाजता त्यांचा मृत्यु झाला. मृत्युनंतर सदर व्यक्तिचा पॉजिटिव्ह रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाला.
तसेच जिल्ह्यात शनिवारला तीन नवीन पॉजिटिव्ह रुग्णांची भर पडली. यात महागाव तालुक्यातील मुडाना येथील युवक (वय 30 वर्ष), पुसद येथील पुरूष (वय 60 वर्ष) आणि नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथील महिला (वय 75 वर्ष) यांचा समावेश आहे. आज या तिघांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 27 वर गेली होती. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेले व सुरवातीला पॉजिटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यात 25 एक्टिव पॉजिटिव्ह रुग्ण भरती आहेत.
सध्यास्थितीत आयसोलेशन वार्डमध्ये 32 जण भरती असून यापैकी 25 ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 171 झाली असून यापैकी 143 जण बरे होवून घरी गेले आहे. तर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिंची संख्या जिल्ह्यात तीन आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2646 नमूने तपासणीसाठी पाठविले. यापैकी 2644 प्राप्त तर दोन अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2473 जण नेगेटिव्ह आले आहे.