सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आज संपूर्ण विश्व कोरोना संकटामुळे भयभयीत झालेले असून ब-याच प्रमाणात जगामध्ये मृत्यूची संख्या वाटत आहे, कोरोनायुध्द साठी पोलीस प्रशासन, गृहरक्षक दल, आरोग्य विभाग,नगरपंचायत विभाग,त्या अनुषंगाने वाॅड क्रमांक १६ व १७ मधे नगरसेवका शोभाबाई संजय मोरे यांच्या तर्फे परिस्थिती जागुन आर्सेनिक अल्बम ३० गोळयाचे वाटप करण्यात आले, या उपक्रमा साठी मान्यवर व सोयगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ याचा सत्कार समाजसेवक संजय मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार नगरपंचायतचे नगराध्यक्ष कैलास काळे,सुनिल ठोंबरे, मंगेश सोहणी,डाॅ.प्रविण पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,
या कार्यक्रमासाठी डाॅ.प्रविण पाटील यांनी गोळया संबधी मार्गदर्शन केले तसेच सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ यांनी महिला वर्ग यांना कोरोना विषयी माहिती समजून सागितले, यावेळी मंगेश सोहणी,योगेश बोखारे, वाॅड क्रमांक १६व १७ मधील महिला – पुरुष अंतराने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सुञ संचालन वसंत पगारे यांनी केले.तर समाजसेवक संजय मोरे यांनी आभार मानले.