कोरोना विषाणू - Covid 19कोल्हापूर जिल्हाप्रशासकीयब्रेकिंग न्युज

कोल्हापूर जिल्ह्यात रविवार दि.१४ पर्यंत एकूण ७२० पॉझीटिव्ह ६२९ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर,दि.१४:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात आजअखेर 720 रूग्णांपैकी 629 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 106 प्राप्त अहवालापैकी 105 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल नाकारण्यात आला. आजअखेर जिल्ह्यात एकूण 83 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 81, गगनबावडा- 6, हातकणंगले- 10, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 66, शाहुवाडी- 179, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 712 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 720 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 720 रूग्णांपैकी 629 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 83 इतकी आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?



    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.