कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजसिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गनगरी दि.१४:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील आणखी १६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.रुग्णालयातून आज आणखी १६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८४ झाली आहे. तर आज नवीन ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मालवण तालुक्यातील २ व कुडाळ तालुक्यातील १ रुग्ण आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण ६४ आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकुरकर यांनी दिली.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीड - १९ च्या तपासणीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ट्रनॅट मशीन द्वारे आतापर्यंत २४१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सदर मशीनद्वारे दिनांक ९ जून २०२० रोजी पासून जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. सद्या जिल्ह्यात दोन ट्रनॅट मशीन आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून एक ट्रॅक मशीन प्राप्त झाल्यामुळे तपासणीचा वेग वाढला आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.