कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसामाजिकसोलापूर जिल्हा

सोलापूर: कोरोनाबाधित रूग्णांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक सेवाभावी संस्थांची मदत

सोलापूर दि.१५:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यविधी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने विहित पद्धती (प्रोटोकॉल) तयार केली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक संस्था, कर्मचारी यांच्यासमवेत बैठक घेऊन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी नियंत्रण कक्षात निश्चिती केली, अशी माहिती कोविड-19 संनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी आज दिली. मृतदेहावर अंत्यसंस्कार संबंधितांच्या धार्मिक रितीरिवाजानुसारच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने काही सामाजिक संस्था, व्यक्ती, विद्युत दाहिनी, औषध फवारणी संस्था नेमून दिल्या आहेत. सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी कोरोनाचा रूग्ण मयत झाला की अंत्यविधीबाबत मृताच्या नातेवाईकांकडून संमतीपत्र घेतल्यानंतर, पुढील कार्यवाही करावयाची आहे असे त्यांनी सांगितले.

संसर्गजन्य दवाखान्यामधील सूचनेनुसार आरोग्यसेविका, जहाँगिर शेख आणि कविता चव्हाण यांनी पुढील कारवाई करणे अपेक्षित आहे. विद्युत दाहिनीची उपलब्धता पाहणे, पावती घेणे गरजेचे आहे. मृतदेह दफन करण्यासाठी जेसीबी चालकाला सूचना करणे, औषध फवारणी करणाऱ्यांना वेळेची व स्थळाची माहिती देणे, पीपीई कीट, मृतदेहासाठी बॅगची व्यवस्था सिव्हील हॉस्पिटलमधून किंवा संसर्गजन्य दवाखान्यातून करून घेणे महत्वाचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  संसर्गजन्य दवाखान्यातील तयारी झाल्यानंतर पीपीई कीट घालून संबंधित रूग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घ्यावा. मृतदेह दफन करायचा असल्यास औषधांची फवारणी करणे महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या धार्मिक विधीनुसार अंत्यविधी करण्यात येणार असून अंत्यविधीनंतर पीपीई कीटची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

  मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत आवश्यक संपर्क क्रमांक

  संसर्गजन्य दवाखाना (आयडी हॉस्पिटल)- 0217-2323700, बाबा मिस्त्री-9890374242, जहाँगिर शेख (लादेन)-8421502668, कविता चव्हाण (सामाजिक संस्थेचे)-8329260974, बाबा (सामाजिक संस्था)-9423326624, श्री.परदेशी (मोदी विद्युतदाहिनी)- 9422457924, कल्याणी (मोदी विद्युतदाहिनी)-9518598125, श्री. लिंगराज (जेसीबी)-8329260974, आलिशा काळे (औषध फवारणी)-8329260974, श्री. मेंडगुळे (औषध फवारणी प्रमुख)-9423993904, शववाहिका चालक-सकाळी 8 ते 4 श्री. चंदनशिवे (9822355473) आणि श्री. लांबतुरे (9503961800), दुपारी 4 ते रात्री 12 श्री. कैयावाले (9822760831) आणि श्री. देवडे (9763740317), रात्री 12 ते सकाळी 8 श्री. लवटे (9767316428) आणि श्री. हणमशेट्टी (8806778405).

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.