औरंगाबाद जिल्हाप्रशासकीयब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध―ना. अब्दुल सत्तार

सोयगाव दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सिल्लोड सोयगाव मतदार संघात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  सोमवार ( दि.15 ) रोजी सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ना. अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ना. अब्दुल सत्तर बोलत होते.

  यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे, युवा नेते अब्दुल समीर ,तहसीलदार प्रवीण पांडे ,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव शिवसेना तालुका प्रमुख दिलीप मचे, तालुका कृषी अधिकारी ए. जी. टाकणकर, शहर प्रमुख गजानन चौधरी, माजी नगराध्यक्ष संतोष बोडके, पंचायत समिती सभापती उस्मान खा पठाण ,कृष्णा राऊत ,अक्षय काळे, रमेश गावंडे, मोतीराम पंडित यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता कल्याण भोसले, सहाय्यक अभियंता एन.बी. वैद्य, शाखा अभियंता आर.बी. राजगुरू, प्रधानमंत्री सडक योजनेचे अभियंता श्री एस. बी. गुडसुरकर आदींची उपस्थिती होती.

  सोयगाव तालुक्यात दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली . यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये कंकराळा ,जरंडी ,सोयगाव इत्यादी भागांमध्ये नुकसानीचे प्रमाण अधिक आहेत.अतिवृष्टीमुळे शेतातील ठिबक संच ,मल्चिंगचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली.शिवाय खरीप हंगामातील मशागत पूर्ण झालेल्या शेतात पाणी वाहल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयगाव मधील शेतकरी शेख अजीज शेख हबीब व सुधाकर सोहनी या शेतकऱ्यांच्या प्रत्येकी बैलजोडी पाण्यात वाहून गेले आहेत. झालेले नुकसान गंभीर असल्याने एकही नुकसानग्रस्त पंचनामा पासून वंचित राहता कामा नये असे स्पष्ट करीत त्वरित पंचनामा चा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना यावेळी ना.अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणांना दिल्या.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.